AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत पहिली विकेट घेताच गोलंदाजाने खिशातून काढली चिठ्ठी, रवि शास्त्रींनी सांगितलं सगळं काही चुकलं

Akash Singh Special Celebration: आयपीएल 2026 स्पर्धेतील 59व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात वेगवान गोलंदाज आकाश सिंहने जबरदस्त गोलंदाजी केली. यावेळी त्याने पहिली विकेट घेतली आणि खिशातून एक चिठ्ठी बाहेर काढली.

IPL 2026 स्पर्धेत पहिली विकेट घेताच गोलंदाजाने खिशातून काढली चिठ्ठी, रवि शास्त्रींनी सांगितलं सगळं काही चुकलं
IPL 2026 स्पर्धेत पहिली विकेट घेताच गोलंदाजाने खिशातून काढली चिठ्ठी, रवि शास्त्रींनी सांगितलं सगळं काही चुकलंImage Credit source: PTI
| Updated on: May 15, 2026 | 9:17 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 59व्या सामन्यात नाणेफेकीची कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी खरं तर हा धक्का होता. कारण दव फॅक्टर पाहता धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स हा सामना जिंकला काय आणि हरला काय? काहीच फरक पडत नाही. कारण प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सने या सामन्यात वेगवान गोलंदाज आकाश सिंहला संधी दिली. या पर्वात त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. कर्णधार ऋषभ पंतने त्याला पावरप्लेमध्ये षटक सोपवलं आणि तीन षटकं टाकायला लावली. आकाश सिंहने कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थकी लावला. त्याने तीन षटकात फक्त 16 धावा दिल्या आणि दोन विकेट काढल्या.

आकाश सिंहचं अनोखं सेलीब्रेशन

आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना आकाश सिंहने पहिल्या षटकात फक्त 7 धावा दिल्या, पण त्याला विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या षटकात त्याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याची विकेट काढली आणि स्पर्धेतील पहिल्या विकेटची नोंद केली. विकेट घेतल्यानंतर त्याने अनोख्या स्टाईलने सेलीब्रेशन केलं. आकाश सिंहने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि त्यावर लिहिलं होतं की, ‘अक्की ऑन फायर, आकाशला टी20 सामन्यात विकेट घेणं जाणतो.’ त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने संजू सॅमसनची विकेट काढली. यावेळीही त्याने खिशातून चिठ्ठी काढली आणि सेलीब्रेशन केलं.

रवि शास्त्री यांचा अंदाज चुकला

आकाश सिंह याच्या कामगिरीमुळे समालोचक रवि शास्त्री यांचं भाकीत चुकलं. या सामन्यापूर्वी रवि शास्त्री एक चिठ्ठी लिहिली होती. त्यावर चेन्नई सुपर किंग्स पावरप्लेमध्ये एकच विकेट गमावेल असं लिहिलं होतं. पण पण आकाश सिंहमुळे हा अंदाज चुकला. कारण त्याने दोन विकेट पावरप्लेमध्ये काढल्या. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचे थेट परिणाम दिसले. रवि शास्त्री म्हणाले की, ‘आकाश सिंहने येऊन सर्व गडबड केली.’ आकाश सिंहला चौथं षटक सोपवलं गेलं. तेव्हा त्याने घातक अशा उर्विल पटेलला तंबूचा रस्ता दाखवला. आकाश सिंहने 4 षटकात 26 धावा देत 3 विकेट काढल्या.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय