AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs CSK : लखनौ विरूद्धच्या सामन्याआधी चेन्नई टीममध्ये कुलदीप यादवची एन्ट्री, यलो आर्मीची ताकद वाढली

Kuldeep Yadav CSK IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स टीमसाठी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना हा प्लेऑफच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याआधी चेन्नई टीममध्ये कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आला आहे. जाणून घ्या.

LSG vs CSK : लखनौ विरूद्धच्या सामन्याआधी चेन्नई टीममध्ये कुलदीप यादवची एन्ट्री, यलो आर्मीची ताकद वाढली
Chennai Super Kings IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: May 15, 2026 | 7:13 PM
Share

आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम (IPL 2026) अखेरच्या टप्प्यात आहे. या हंगामातील 58 व्या सामन्यानंतरही प्लेऑफसाठी एकही संघ अधिकृरित्या पात्र ठरलेला नाही. तर 2 संघ या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे 4 जागांसाठी जोरदार चुरस आहे. मुंबई इंडियन्सने गुरुवारी 14 मे रोजी पंजाब किंग्सला पराभूत केलं. पंजाबचा हा सलग पाचवा पराभव ठरला. यासह पंजाबचं प्लेऑफचं समीकरण बिघडलंय. पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकून अजिंक्य असणारी पंजाबची आता करो या मरो अशी स्थिती झाली आहे.

पंजाब विरुद्ध मुंबई मॅचनंतर 59 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना 15 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. लखनौ स्पर्धेतून बाहेर झालीय. तर चेन्नईला प्लेऑफची संधी आहे. त्यामुळे चेन्नईसाठी लखनौ विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्याआधी चेन्नईची ताकद वाढली आहे. चेन्नई टीममध्ये अचानक कुलदीप यादव याची एन्ट्री झाली आहे. आयपीएलकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

चेन्नई टीममध्ये बदल

चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे आयपीएलकडून खलीलच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलंय. खलीलच्या जागी कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आलाय. मात्र हा कुलदीप आणि टीम इंडियासाठी खेळणारा कुलदीप वेगळा आहे.

खलीलला काय झालं?

खलीलला या मोसमात 5 सामने खेळल्यानंतर दुखापत झाली होती. खलीलला या दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं. खलीलच्या जागी संधी मिळालेला कुलदीप याआधी आयपीएल स्पर्धेत खेळलाय. कुलदीपने 2021 आणि 2023 साली राजस्थान रॉयल्ससाठी 3 सामन्यांत 2 विकेट्स मिळवल्या. चेन्नईने कुलदीपला 30 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलंय.

प्लेऑफआधी 2 खेळाडूंना आयपीएल 2026 स्पर्धेत संधी

आरसीबीकडून कुणाला कुणाच्या जागी संधी?

तसेच चेन्नई व्यतिरिक्त गतविजेत्या आरसीबी टीममध्येही एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबीने 38 वर्षीय गोलंदाज रिचर्ड ग्लीसन याला संधी दिली आहे. रिचर्डसाठी आरसीबीने 1 कोटी 60 लाख रुपये मोजले आहेत. रिचर्डला नुवान तुषारा याच्या जागी संधी देण्यात आलीय. नुवान फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे रिचर्डला अखरेच्या टप्प्यात संधी मिळालीय.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय