AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते राजकुमार सर्वांना जानी म्हणायचे, जानी या नावाचं कुत्र्याशी काय कनेक्शन?

अभिनेते राजकुमार आपल्या 'जानी' या खास संवादासाठी प्रसिद्ध होते. ते अनेकांना 'जानी' म्हणून संबोधायचे, पण यामागे एक रंजक रहस्य आहे. निर्माते केसी बोकाडिया यांच्या मते, राजकुमार यांच्या कुत्र्याचे नाव 'जानी' होते. ते कुत्र्याला प्रेमाने या नावाने हाक मारत. याचमुळे त्यांनी इतरांनाही 'जानी' म्हणायला सुरुवात केली.

अभिनेते राजकुमार सर्वांना जानी म्हणायचे, जानी या नावाचं कुत्र्याशी काय कनेक्शन?
raj kumarImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 10:31 PM
Share

अभिनेते राजकुमार आपल्या खास संवादफेकीसाठी आणि स्वभावासाठी प्रसिद्ध होते. सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी ते एक होते. पण त्यांचा स्वभाव थोडा तऱ्हेवाईक होता. ते अनेकांची सर्वांसमोर उरलीसुरली काढून टाकायचे. बरं कुणाचा अपमान करण्यासाठी ते पाणउतारा करायचे नाहीत. तर आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी, आपला रुबाब दाखवण्यासाठी ते असं करायचे. राजकुमार यांचा स्वभाव थोडा विचित्र असला तरी ते अतिशय गंभीर स्वभावाचे होते. तसेच कुणाला आदर द्यायचा आणि कुणाला नाही, याचीही त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळेच त्यांच्याबाबतचे किस्से आजही चर्चिले जातात.

प्रसिद्ध निर्माते केसी बोकाडिया यांनी एका मुलाखतीत राजकुमार यांच्याशी संबंधित एक किस्सा ऐकवला. हा किस्सा मजेदार आहे. पण तो धक्कादायक आहे. यातून राजकुमार यांचा बेरकी स्वभाव दिसून येतो. केसी बोकाडिया म्हणाले की, राजकुमार यांना सांभाळणं कठिण होतं. त्यांच्यासोबत काम करणं सोपं नव्हतं. एकवेळ अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं जमू शकतं. पण राजकुमार यांच्यासोबत काम करणं म्हणजे दिव्य काम होतं, असं केसी बोकाडिया म्हणाले. यावेळी त्यांनी 1992मध्ये आलेल्या त्यांच्या पुलीस और मुजरीम या सिनेमाशी संबंधित एक किस्सा ऐकवला.

हसू फुटेल…

राजकुमार प्रत्येकाला जानी म्हणून संबोधायचे. अनेक सिनेमातही त्यांच्या डायलॉगमध्ये जानी हा शब्द असायचाच. त्यामुळे जानी हा शब्द खूप फेमस झालेला आहे. राजकुमार जेव्हा कुणाला जानी म्हणून संबोधायचे तेव्हा त्या व्यक्तीला भरून पावल्यासारखं वाटायचं. पण या जानीचा नेमका अर्थ अनेकांना माहीत नाही. जानी या शब्दाचं आणि कुत्र्याचं काय कनेक्शन आहे हेही कुणाला माहीत नाही. तुम्ही जेव्हा हे कनेक्शन ऐकाल तर धक्काच बसेल. त्यावरून तुम्हाला राजकुमार किती बेरकी होते हे दिसून येईल. तसेच हा किस्सा ऐकल्यावर तुम्हाला हसूही आवरणार नाही. केसी बोकाडिया यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

पण मला कधीच…

केसी बोकाडिया म्हणाले की, राजकुमार यांच्या कुत्र्याचं नाव जानी होतं. ते आपल्या कुत्र्याला प्रेमाने जानी म्हणायचे. त्यामुळेच ते प्रत्येक व्यक्तीला जानी म्हणूनच संबोधायचे. पण माझं नशीब चांगलं की ते मला नेहमी बोकाडिया साहब म्हणूनच हाक मारायचे. त्यानंतर केसी बोकाडिया यांनी आणखी एक मजेदार किस्सा ऐकवला. पुलीस और मुजरीम या सिनेमात काम करण्यासाठी राजकुमार यांना केवळ एका फोनवर कसं तयार केलं, याची माहितीच त्यांनी दिली.

राजकुमार मुडी होती…

एका संध्याकाळी मी त्यांना फोन केला. दुसऱ्याच दिवशी मुहूर्ताच्या शॉटचा माझा प्लान होता. राजकुमार यांची एक खासियत होती. एखाद्याचा चेहरा ओळखीचा वाटत नसेल तर ते त्याच्याशी काम करत नसायचे. मग सिनेमाची कहाणी वगैरे त्यांच्यासाठी फिजूल असायची. मी त्यांना फोन केला. म्हणालो, राज साहेब तुम्हाला सिनेमाची एक लाईन सांगायची आहे. ते ऐकायला तयार झाले. तसं पाहिलं तर अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही राजकुमार यांना सांभाळणं कठिण होतं. अमिताभ बच्चन सर्व काही हिसाब किताब ठेवणारे होते. तर राजकुमार मुडी स्वभावाचे होते, असं त्यांनी सांगितलं.

अन् ते तयार झाले

हिशोब वगैरे ठेवणाऱ्यांना सांभाळणं सोप्पं असतं. पण मुडी व्यक्तीला सांभाळणं कठिण असतं. त्यांचा कधी मूड बदलेल याचा नेम नसतो. मी राजकुमार यांनी सीन ऐकवला. त्यांना तो आवडला. मी त्यांना लगेच सिनेमात काम करण्याची गळ घातली. त्यावर त्यांनी नाही म्हणून टाकलं. जेव्हा पैशाची चर्चा झाली. तेव्हा त्यांनी एक रक्कम सांगितली. मी त्यापेक्षा अधिक पैसे देतो म्हणून सांगितलं. मी त्यांना विचारलं किती पैसे पाहिजे. ते म्हणाले, मागच्या वेळी किती दिले होते? मी म्हटलं 21 लाख. त्यांनी मला अजून जास्त पैसे मागितले. मी त्यांना 23 लाख म्हटलं. त्यांनी 24 लाख मागितले. मी लगेच त्यांना 25 लाख देतो म्हणून सांगितलं. मी त्यांना जास्त पैसे सांगून त्यांच्याकडून एक फेव्हर मागितला. उद्याच सिनेमाचा मुहूर्त आहे. तुम्ही या म्हणून सांगितलं. ते तयार झाले, असं बोकाडिया म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा