AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घरातील कपाटावर या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा बँक अकाऊंट रिकामं झालंच म्हणून समजा

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील कपाट ही एक महत्त्वाची वस्तू असते. कारण अनेक घरांमध्ये कपाटातच तिजोरी देखील असते. तिजोरीमध्ये पैसे तसेच मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. अशा स्थितीमध्ये तुम्ही कपाटावर काही विशिष्ट गोष्टी ठेवल्या तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. तुमच्या हातात पैसा टिकत नाही, तसेच तणाव देखील वाढतो.

Vastushastra : घरातील कपाटावर या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा बँक अकाऊंट रिकामं झालंच म्हणून समजा
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 15, 2026 | 9:13 PM
Share

तुमच्या घरात असलेलं कपाट ही एक महत्त्वाची वस्तू आहे. कारण अनेकांची तिजोरी याच कपाटामध्ये असते. आपण तिजोरीमध्ये पैसे, आणि मौल्यवाण वस्तू ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार जर तुमची तिजोरी तुमच्या कपाटात असेल तर अशावेळी कपाटावर काही वस्तू ठेवणं जाणिवपूर्वक टाळलं पाहिजे. जर तुम्ही या वस्तू कपाटावर ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्यांना आमंत्रण मिळतं, हातात पैसा टिकत नाही. तसेच घरात ताण तणाव देखील वाढतो. परंतु आपण अनेकदा कपाटावर मोकळी जागा आहे, घरात निरपयोगी वस्तुंचा राडा होतो, म्हणून आपण या वस्तू कपाटावर ठेवतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार ही एक मोठी चुक आहे. जेव्हा तुम्ही अशा वस्तू कपाटावर ठेवतात, तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, घरात ताण तणाव वाढतो, ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर देखील होतो. तसेच आर्थिक समस्या देखील निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार कपाटावर कधीही जड वस्तू तसेच टाकाऊ कामाच्या नसलेल्या वस्तू ठेवू नये. यामुळे कुटुंब प्रमुखाच्या मनावर ताण निर्माण होतो. कुटुंब प्रमुखाला डोके दुखीचा त्रास देखील होऊ शकतो, त्याच्या मनावर अकारण दडपण निर्माण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच तुम्ही जर कपाटावर जड वस्तू ठेवल्या तर त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या देखील जाणवू लागतात. तुम्ही कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे कपाटावर अशा कोणत्याही वस्तू ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

राहु केतु दोष – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचं कपाट आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ केलं पाहिजे. जर कपाटाला जाळे लागले असतील, कपाटावर धुळ साचली असेल तर ही स्थिती घरात राहुदोष निर्माण करते. जेव्हा घरात राहु दोष निर्माण होतो, तेव्हा काहीही कारण नसताना अचानक भांडणाला सुरुवात होते. पती-पत्नीचं पटत नाही. ज्याचा परिणाम हा तुमच्या मुलांच्या मानावर देखील होऊ शकतो. त्यामुळे राहु दोष दूर करण्यासाठी कपाट नेहमी स्वच्छ ठेवावं, कपाटावर धुळ साचू देऊ नये. जर तुमचं कपाट हे स्वच्छ असेल तर तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहते.

वास्तुशास्त्रानुसार तुमचं कपाट हे नेहमी दक्षिण पश्चिम दिशेलाच असावं. यामुळे घरात आर्थिक बरकत येते. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार