AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 8th October 2026 : 8 ऑक्टोबरला कोणत्या राशींना मिळणार मोठी संधी? जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Horoscope Today 8th October 2026, Thursday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 8th October 2026 : 8 ऑक्टोबरला कोणत्या राशींना मिळणार मोठी संधी? जाणून घ्या तुमचं राशिभविष्य
| Updated on: Oct 07, 2026 | 9:52 PM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 8th October 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope) – हा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि सकारात्मक संकेत देणारा ठरू शकतो. एखाद्या धार्मिक किंवा शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि उत्साह वाढेल. मात्र, दूर असलेल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची आठवण आल्याने तुम्ही भावूक होऊ शकता. नोकरी किंवा करिअरशी संबंधित एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो; पण तुमची समजूतदारपणा आणि प्रसंगावधान यामुळे परिस्थिती बिघडणार नाही. तुमची हुशारी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता आज अनेक कठीण कामे सहज पूर्ण करण्यात मदत करेल. मात्र कोणतेही काम गृहीत धरू नका आणि निष्काळजीपणा टाळा.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) –  कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. परस्परांमध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास वाढेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुमच्या ओळखी वाढतील आणि समाजातील तुमचा प्रभावही मजबूत होऊ शकतो. विरोधकांच्या हालचाली ओळखून त्यांना योग्य उत्तर देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मात्र तुमच्या वैयक्तिक किंवा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाशी शेअर करू नका. कामाचा ताण वाढल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. एखाद्याकडून घेतलेले कर्ज किंवा उधार बाकी असल्यास ते फेडण्याचा दबाव वाढू शकतो. आजचा दिवस जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच नात्यांचे महत्त्वही जाणवून देईल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली जाईल, त्यामुळे समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यांमध्ये प्रेम व गोडवा कायम राहील.तुमच्या जीवनसाथीला नोकरी किंवा एखाद्या नवीन संधीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. या संधीमुळे त्यांना काही काळासाठी बाहेर जावे लागू शकते. एखादे काम जवळपास पूर्ण झालेले असताना अचानक अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे थोडी चिंता निर्माण होईल; मात्र ही अडचण फार काळ टिकणार नाही. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनात उत्साह आणि भविष्यासंबंधी नवीन आशा निर्माण होतील.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष द्या. बजेटच्या बाहेर जाऊन खर्च करण्याचे टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा भविष्यासंबंधी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासंबंधीही विचार होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या करिअर किंवा कामाशी संबंधित समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतील. भावंडांचे सहकार्य आणि आधार तुम्हाला मानसिक बळ देईल. घराच्या दुरुस्ती, सजावट किंवा नूतनीकरणाचे एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – हा दिवस तुमच्यासाठी विशेष आणि संस्मरणीय ठरू शकतो. नवीन व्यक्तींशी होणाऱ्या भेटी भविष्यात तुमच्या करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. अशा वातावरणामुळे मनाला शांतता मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये काही संवेदनशील प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईने बोलण्याऐवजी संयमाने परिस्थिती हाताळा. छोट्या कारणावरून राग व्यक्त करणे किंवा घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) –  नवीन संधी मिळू शकते आणि सकारात्मक बदल होऊ शकतो. प्रवासादरम्यान किंवा फिरताना तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. या माहितीचा भविष्यात तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक किंवा मार्गदर्शकांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या सल्ल्याचा योग्य उपयोग केल्यास अभ्यासात प्रगती करता येईल. व्यवसायात काही चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे मनात चिंता निर्माण होईल; पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वाहन खरेदी करण्याचा विचार सुरू असल्यास आज त्याबाबत पुढील नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सहकार्य तुमच्या एखाद्या रखडलेल्या कामाला गती देऊ शकते.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आर्थिक बाबतीत तुम्हाला दिलासा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत असल्याचे जाणवेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता आज विशेष उपयोगी ठरेल. मात्र कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. छोटीशी चूकदेखील नुकसानाचे कारण बनू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन रमल्यामुळे मानसिक शांतता मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) –  जमीन, घर किंवा इतर मालमत्तेशी संबंधित चांगल्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखादा कायदेशीर विषय सुरू असल्यास अनुभवी व्यक्ती किंवा योग्य कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. आज स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा अधिक तीव्र राहील. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी संयम, धैर्य आणि सातत्य कायम ठेवा. वडिलांसोबत एखाद्या मुद्द्यावर मतभेद किंवा तणाव असल्यास वाद वाढवण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. संयमाने चर्चा केल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – जोडीदाराच्या भावना समजून घेणे विशेष महत्त्वाचे ठरेल. तुमच्या एखाद्या छोट्याशा वक्तव्याचाही त्यांना गैरसमज होऊ शकतो आणि त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून बोलताना शब्दांची काळजी घ्या आणि संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम मिळत नसल्यामुळे तुम्ही थोडे निराश होऊ शकता. अशा परिस्थितीत नोकरी बदलण्याचा किंवा नवीन करिअरच्या संधी शोधण्याचा विचार तुमच्या मनात गंभीरपणे येऊ शकतो.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक राहील. जुन्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित एखादी अडचण दूर झाल्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो.मुलांच्या परीक्षेचा चांगला निकाल लागल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. वडिलांसोबत एखाद्या महत्त्वाच्या कामाबाबत किंवा निर्णयाबाबत चर्चा होऊ शकते. आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या एखाद्या रखडलेल्या कामाला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची प्रतिष्ठा वाढू शकते आणि समाजातील त्यांचा प्रभाव मजबूत होऊ शकतो.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – हा दिवस आनंदी आणि प्रसन्न क्षणांनी भरलेला राहू शकतो. मित्र किंवा जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मात्र इतरांच्या समस्या स्वतःवर घेण्याचे टाळा. त्यांच्या अडचणींमध्ये गरजेपेक्षा जास्त गुंतल्यास त्यांचा ताण तुमच्यावरही येऊ शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक दिलासा मिळून मन प्रसन्न होईल. जर तुम्ही दुसऱ्याचे वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या. भूतकाळातील चुका पुन्हा करण्याऐवजी त्यातून धडा घेऊन पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एखादा महत्त्वाचा निर्णयही आज घेतला जाऊ शकतो.

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – कोणतंही  मोठं पाऊल उचलण्यापूर्वी सारासार, नीट विचार करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये. विशेषतः पैशांशी संबंधित वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. सरकारी कामांमध्ये विलंब किंवा काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे घाई न करता संयमाने काम करा. एखादा विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतो; मात्र शांत राहून आणि योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्यास तुम्ही त्यावर मात करू शकता. मुलांकडून एखादे गोड सरप्राइज किंवा भेट मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आईला दिलेले एखादे वचन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तिचा विश्वास आणि आशीर्वाद दोन्ही मिळतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...