AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani : मी कधीच विसरणार नाही, टॉक्सिकमध्ये बोल्ड सीन देणाऱ्या यशनं कियाराच्या पहिल्या प्रेग्नन्सीवर दिलेली प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना

Kiara Advani : कियारा अडवाणी आणि यश यांनी 'टॉक्सिक' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. अभिनेत्रीनं ज्यावेळी यशला तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलेलं, त्यावर यशची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल कियारानं एका कार्यक्रमात सांगितलेलं.

Kiara Advani : मी कधीच विसरणार नाही, टॉक्सिकमध्ये बोल्ड सीन देणाऱ्या यशनं कियाराच्या पहिल्या प्रेग्नन्सीवर दिलेली प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
| Updated on: Oct 07, 2026 | 9:41 PM
Share

अभिनेत्री कियारा अडवाणीनं बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. या घोषणेदरम्यान, कियाराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अभिनेत्रीनं तिच्या ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटातील सहकलाकार यशनं तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या बातमीवर कशी प्रतिक्रिया दिली होती, याबद्दल सांगितलं होतं.

चेन्नईमध्ये ‘टॉक्सिक फिल्म्स’च्या एका कार्यक्रमात प्रेक्षकांशी बोलताना कियारानं सांगितलेलं की, तिच्या कुटुंबाव्यतिरिक्त यश आणि चित्रपटाच्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास हे पहिले लोक होते ज्यांना तिनं तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं.

कियारा अडवाणी काय म्हणाली?

कियारा म्हणाली की, ‘त्या क्षणी, आपण चित्रपट कसा पूर्ण करणार, त्याची व्यवस्था काय असेल, किंवा अशा कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार केला नव्हता. तुम्हा दोघांच्या (गीतू मोहनदास आणि यश) डोळ्यात अश्रू होते आणि तुम्ही आनंदी होतात. तुम्ही माझं अभिनंदन केलं आणि म्हणालात, ‘कियारा, आता तू तुझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम क्षण अनुभवणार आहेस.’

कियारा म्हणाली की, त्यांच्या प्रतिक्रियेनं तिला खूप गहिवरून आलं आणि त्यांच्या व्यावसायिक भूमिकेच्या पलीकडे ते खरोखर कसे आहेत हे त्यातून दिसून आलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिची सेटवर खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली. कियारा म्हणाली, ‘माझ्यासाठी कोणीतरी इतकं आनंदी असलेलं पाहून माझं मन भरून आलं. मी ते कधीही विसरणार नाही.’ पुढे कियारा यशचं कौतुक करत म्हणाली की, ‘तू जसा आहेस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार.’

दरम्यान, यश आणि सिद्धार्थनं बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी शेअर केली आणि आपला आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. कियारा आणि सिद्धार्थने पोस्टमध्ये लिहिलं, ‘आम्ही पुन्हा एकदा आई–बाबा होणार आहोत.’ कियारा आणि सिद्धार्थनं २०२५ मध्ये त्यांच्या पहिल्या अपत्याचं, एका मुलीचं, स्वागत केलं. त्यांची मुलगी, सराया मल्होत्राचा जन्म १५ जुलै, २०२५ रोजी मुंबईत झाला.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...