AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन… प्लीज झोपू नका, आम्हाला तुमची गरज आहे… स्मित मच्छार यांचा जीव कुणी वाचवला?

दुबई-इस्रायल फ्लायदुबई विमानात कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जीव धोक्यात होता. त्यावेळी तेल अवीवचे दंतवैद्य डॉ. शोता मुसायेव यांनी धाडसाने ४५ मिनिटे त्यांना शुद्धीत ठेवले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व त्यांची शुद्ध कायम ठेवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, ज्यामुळे स्मित मच्छार यांचे प्राण वाचले.

कॅप्टन... प्लीज झोपू नका, आम्हाला तुमची गरज आहे... स्मित मच्छार यांचा जीव कुणी वाचवला?
Captain Smit MachharImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 11:48 PM
Share

दुबईवरून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबई फ्लाइटमध्ये झालेल्या थरारक घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. त्यांच्या कवटीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. त्यावेळी स्मित मच्छार यांचा जीव एका डेंटिस्टने वाचवला. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याचा थरारक प्रसंग या डॉक्टरने शेअर केला आहे. स्मित मच्छार रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळी त्यांना 45 मिनिटे शुद्धीत ठेवण्याचं काम या डॉक्टरने केलं. विमानाचं लँडिंग होईपर्यंत हा डॉक्टर स्मित मच्छार यांना शुद्धीत ठेवण्यासाठी संघर्ष करत होता. वेळ हातातून निघून जाऊ नये, याची मला भीती होती, असं या डॉक्टरने सांगितलं. त्यांनी स्मित यांना शुद्धीत ठेवल्यानेच त्यांचे प्राण वाचू शकले.

डॉ. शोता मुसायेव असं या 47 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. ते तेल अवीवच्या होलोन या शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी द नॅशनलला दिलेल्या मुलाखतीत तो थरारक प्रसंग सांगितला. त्यांनी या 45 मिनिटात स्मित यांच्या डोक्यातून आणि हातातून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. स्मित यांच्या डाव्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत होतं. मी जखम दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी टी शर्टचा वापर केला. पण रक्त थांबणं काही बंद झालं नाही. त्यामुळे मी स्टीवर्ड्सकडून बर्फ घेतला आणि त्याने रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला, असं मुसायेव यांनी सांगितलं.

अन् शरीराची हालचाल थांबली

स्मित यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तसेच त्यांचा रक्तदाब वेगाने कमी होत होता. त्यामुळे आम्ही विमानातील उपलब्ध किट, नॅपकिन आणि बर्फाचा वापर करून त्यांना शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अत्याधिक रक्त वाहून मृत्यू होऊ नये म्हणून त्यांच्या डोके आणि मानेतील जखम दाबून ठेवली, असं त्यांनी सांगितलं.

शरीरात रक्ताची कमी झाल्याने स्मित यांचे डोळे बंद होऊ लागले होते. त्यांचे ओठ निळे पडले. त्यामुळे आम्ही त्यांना सतत स्मित, डोळे उघडे ठेवा, तुमच्या मुलांबाबत विचार करा, असं सांगत होतो. जेव्हा स्मित यांच्या शरीराने प्रतिसाद देणं बंद केलं तेव्हा आम्ही त्यांचे दोन्ही पाय उचलले. त्यांच्या मेंदू आणि हृदयाला रक्तपुरवठा होण्यासाठी ही शक्कल लढवली. त्यामुळे त्यांच्या पल्स सुरू झाल्या, असंही ते म्हणाले.

घाबरू नका, आता लँड होणार आहे

विमानातून बाहेर पडण्यासाठीच्या चिंचोळ्या जागेत बसून मुसायेव हे स्मित यांना एमर्जन्सी मदत देत होते. त्यांना शुद्धीत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मी त्यांना म्हटलं, कॅप्टन, कृपया तुम्ही झोपू नका. आम्हाला तुमची गरज आहे. त्यानंतर मी त्यांना त्यांचं नाव विचारलं. त्यांना किती मुलं आहेत याची माहिती विचारली. मी त्यांना वारंवार प्रश्न विचारून बोलतं करत होतो. तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे परत जाणार आहात. आपण लवकरच लँड करणार आहोत, असं त्यांना वारंवार सांगत होतो, असंही मुसायेव यांनी सांगितलं.

दरम्यान, यूएईच्या अटॉर्नी जनरल हमद अल शम्सी यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. या घटनेतील को-पायलटने कॉकपीटमध्ये धारदार शस्त्राने स्मित यांच्यावर हल्ला केला. विमान कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमान सौदीत उतरवण्यात आल्याचं शम्सी यांनी सांगितलं.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?