AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाचा सर्वात मोठा बाटलीबंद पाण्याचा ब्रँड चाचणीत दोनदा फेल, कॅन्सरचे घटक आढळल्याने केस दाखल होणार

देशाच्या सर्वात मोठी पॅकबंद पाण्याचा ब्रँड Bisleriचे नमूने तपासणीत पिण्यालायक नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता FSSAI ने कंपनीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली आहे.

देशाचा सर्वात मोठा बाटलीबंद पाण्याचा ब्रँड चाचणीत दोनदा फेल, कॅन्सरचे घटक आढळल्याने केस दाखल होणार
packaged drinking water
| Updated on: Nov 22, 2026 | 11:47 PM
Share

बाटलीबंद पाणी आपण डोळेबंद करुन बिनधास्त पित असतो. मात्र, आता एक धक्कादायक घटना घडली आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध बिसलेरी कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. खाद्य पदार्थांचे सुरक्षा पाहणारी सरकारी संस्था FSSAI ने रविवारी बिसलेरीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली आहे. कारण या बाटलीबंद पाण्याचे नमूने दोनदा चाचणीत फेल झाले आहेत. याचा अर्थ बिसलेरीचे पाणी पिण्याच्या लायक नसल्याचे या तपासणीत आढळले आहे.

पहिल्या चाचणीत पाण्यात आरोग्यासाठी धोकादायक मानले जाणाऱ्या ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळले. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली, परंतु त्यातही पाणी असुरक्षित असल्याचे आढळले. यावेळी, पीएएच (PAHs) नावाचे कर्करोग-कारक घटक देखील पाण्यात आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे, पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरीच्या आवारातून गोळा करण्यात आले होते.

बिस्लेरीचे पाणी पिण्यास अयोग्य – FSSAI

ब्रोमेट आणि पीएएच (PAHs) या दोन्हींना कर्करोग-कारक पदार्थ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. बिस्लेरीवरील कारवाईबाबत, एफएसएसएआयने म्हटले आहे की हे पाणी पिण्यास अयोग्य आहे आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल. मात्र, या कंपनीने याबद्दल त्यांची बाजू मांडलेली नाही.

५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या ब्रँडवरील कारवाईने लोकांना धक्का बसला आहे. मात्र, एफएसएसएआयने केवळ बिस्लेरीवरच नव्हे, तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे. FSSAI ने वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीमांसा इंडस्ट्रीज, आणि आशा कन्फेक्शनरी आणि इतर काही खाद्य कंपन्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत आणि उत्पादने बाजारातून परत मागवण्याचे आदेश जारी केले आहेत.

अनेक कंपन्यांचे परवाने निलंबित

नियमांचे पालन न केल्यामुळे FSSAI ने उर्मी लाइफसायन्स आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर यांचे परवाने निलंबित केले आहेत. FSSAI ने आशा कन्फेक्शनरीविरुद्ध उत्पादन परत मागवण्याचा आदेश जारी केला असून, त्यांची चॉकलेट भरलेली प्री-पॅकेज्ड बिस्किटे असुरक्षित आढळल्याने कंपनीला ती परत मागवण्याचे निर्देशही दिले आहेत.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!