AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एन्ट्री अन् अशोक सराफ यांच्या लेहंग्याची नाडीच तुटली, नामुष्कीची वेळ… त्या नाटकावेळी काय घडलं?

अभिनेते अशोक सराफ यांच्या एका नाट्यप्रसंगाचा हा मजेशीर किस्सा आहे. 'प्रेमा तुझा रंग कसा?' या नाटकावेळी, त्यांची एन्ट्री होणार असताना अचानक लेहंग्याची नाडी तुटली. नामुष्कीची वेळ आली असता, ऐनवेळी एका सुंभाच्या मदतीने त्यांनी परिस्थिती कशी सांभाळली आणि मोठी फजिती टाळली, याचा अनुभव त्यांनी सांगितलाय.

आता एन्ट्री अन् अशोक सराफ यांच्या लेहंग्याची नाडीच तुटली, नामुष्कीची वेळ... त्या नाटकावेळी काय घडलं?
ashok sarafImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 11:45 PM
Share

अभिनेते अशोक सराफ आपल्या अभिनयाने भल्याभल्यांना खिळवून ठेवतात. नायक असो, खलनायक असो, गंभीर भूमिका असो की विनोदी भूमिका असो, प्रत्येक भूमिका अशोक सराफ जगत असतात. आपल्या आजूबाजूलाच या घटना घडतात की काय असा त्यांचा अभिनय असतो. मग तो सिनेमातील असो की नाटकातील असो. प्रत्येक प्रसंग ते जीवंत करतात. पण अनेकदा नाटकाच्या दौऱ्यावर गंमतीजमती घडत असतात. कधी जीवावरचा प्रसंग येतो तर कधी फजिती होण्याची वेळ येते. एका नाटकाच्यावेळी अशीच एक घटना घडली. त्यावेळी अशोक सराफ यांची चांगलीच फजिती होणार होती. पण थोडक्यात निभावलं गेलं. नेमकं काय झालं त्यावेळी?

अशोक सराफ हे मराठी कोण होणार करोडपतीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रेमा तुझा रंग कसा? या नाटकाचा एक किस्सा सांगितला. या नाटकावेळी कशी नामुष्कीची वेळ येणार होती, हा प्रसंग त्यांनी शेअर केला. नाटक सुरू झालं होतं. मी एन्ट्रीसाठी उभा आहे. स्टेजवरच्या नटाची दोन वाक्य संपली की माझी एन्ट्री आहे. मी लेहंगा आणि सदरा घातलेला आहे. मी विंगेत उभा होतो. स्टेजवरच्या अभिनेत्याची दोन वाक्य संपायच्या आधी माझ्या लेहंग्याची नाडी तुटली. आणि लेहंगा खाली आला. दोन वाक्यानंतर माझी एन्ट्री आहे. मी पटकन लेहंगा उचलला आणि दोन्ही हाताने धरून ठेवला. अशा अवस्थेत कशी एन्ट्री घेणार? आता काय करावं? हेच सूचेना. मी इकडे तिकडे पाहत होतो. आजूबाजूला कोणीच नव्हतं. टेन्शन आलं. वाक्य संपतंय…वाक्य येतंय… अरे अरे … असं वाटायला लागलं, असं अशोक सराफ म्हणाले.

पडदाच पाडावा लागला असता

त्यानंतर मी सहज वर पाहिलं. फ्लॅट सीनवर एक सुंभ होता. मी सुंभ घेतला. लेहंगा बांधला. आणि तसाच पुढचा सर्व अंक केला. मला एक कळत नाही. हे सर्व झालेलं असताना, आजूबाजूला सर्व स्वच्छता असताना त्या फ्लॅट सीनवर सुंभ कोणी ठेवला? मी तर नाही ठेवला? कोणाला माहीत होतं म्हणून ठेवला नाही? ही घटना घडणार म्हणून ठेवलेला नव्हता. मग तो आला कुठून? त्याचवेळी माझं लक्ष जावं आणि मी तो सुंभ बांधावा. आणि पुढचं नाटक करावं. नाही तर नामुष्कीची गोष्ट होती. मला त्यावेळी पडदाच पाडावा लागला असता, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

आपम कोण नाही…

आपण रंगदेवता म्हणतो ना… मग… मग…खरंच देवता आहे. आयत्यावेळी ती तुम्हाला विसरायलाही लावते. आयत्यावेळी ती तुम्हाला ब्लँकही करते. नाही तर वाक्य फाफलून टाकता तुम्ही कसंही. ती करते सर्व. आपण काही नाही. आपण कोण नाही, हे मी त्या प्रसंगाने शिकलो. तुम्ही कोण नाही. तुमच्याकडून हे घडवलं जातं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!