AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Kolhe | अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद, विद्यार्थी आमनेसामने

Amol Kolhe | अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद, विद्यार्थी आमनेसामने

| Updated on: Feb 20, 2026 | 1:32 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर व्याख्यान देण्यासाठी पुणे विद्यापीठाने खासदार आणि अभिनेता अमोल कोल्हे यांना बोलावले होते. या व्याख्यानाला काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला असून, त्यांनी आपले पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवले. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर व्याख्यान देण्यासाठी पुणे विद्यापीठाने खासदार आणि अभिनेता अमोल कोल्हे यांना बोलावले होते. या व्याख्यानाला काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला असून, त्यांनी आपले पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवले. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. दुसरीकडे, कोल्हे यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थ्यांनीही कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त आयोजित या व्याख्यानाभोवती पुण्यात वादाची सुरुवात झाली आहे. अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आणि आपली बाजू मांडली आहे. विद्यापीठाने ऑफिशियल मेल करून मला छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि इतिहास सांगणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. राजकीय बाजू बाजूला ठेवून हे काम मी करत आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोल्हे यांनी स्पष्ट केले की, काही विद्यार्थ्यांनी राजकीय पार्श्वभूमी नको म्हणून विरोध केला, तर काही विद्यार्थ्यांनी व्याख्यान व्हावे अशी भूमिका घेतली आहे. विद्यापीठाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Published on: Feb 20, 2026 01:32 PM