AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : करिअरमध्ये यश मिळवायचंय? मग या सोप्या गोष्टी कराच, भाग्य उजळेल

फेंग शुई हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं, आज आपण करिअरमध्ये यश मिळण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

Feng Shui : करिअरमध्ये यश मिळवायचंय? मग या सोप्या गोष्टी कराच, भाग्य उजळेल
करियरमध्ये यशासाठी उपाय
| Updated on: Feb 20, 2026 | 8:51 PM
Share

फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे, वास्तुशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्यातील अनेक गोष्टी या फेंग शुईमध्ये देखील सांगण्यात आल्या आहेत. मात्र काही बाबतीमध्ये दोन्ही शास्त्रात फरक आढळून येतो. मात्र फेंग शुई आणि वास्तु शास्त्र या दोन्ही शास्त्रांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून, सकारात्मक ऊर्जा वाढवणे, जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तिचा परिणाम हा त्या घरातील कुटुंबप्रमुखासह घरातील सर्वच सदस्यांवर होत असतो. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा घरात काहीही कारण नसताना अचानक वादविवाद वाढतात, पती-पत्नीमध्ये विनाकारण भांडणं होतात, तसेच अचानक एखादं आर्थिक संकट, व्यापारात नुकसान असे अनुभव येऊ शकतात. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण जर करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर काय उपाय सांगण्यात आले आहेत? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तिजोरीत आरसा लावा – जर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर त्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील होतो. तुम्ही पैसे कितीही कमावले तरी ते तुमच्या हातात टिकत नाहीत, त्यामुळे आर्थिक संकट टाळण्यासाठी फेंग शुईमध्ये घरातील तिजोरीमध्ये आरसा लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे, यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होऊन तिजोरी पैशांनी भरलेली राहील, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

डायमंड क्रिस्टल – घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फेंगशुईमध्ये हा देखील एक उपाय सांगण्यात आला आहे, फेंग शुईनुसार तुम्ही जर तुमच्या टेबलवर किंवा छतावर डायमंड क्रिस्टल लावला तर त्यामुळे सर्व प्रकारच्या वाईट आणि नकारात्मक शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. सर्वप्रकारचे वास्तुदोष दूर होतात.

विंड चाइम – विंड चाइमचा आवाज हा फेंग शुईमध्ये अत्यंत शुभ मानला गेला आहे, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावावे असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, त्यामुळे तुम्ही जर घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावला तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

दक्षिणेला लाल बल्ब – तसेच फेंग शुईमध्ये तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लाल बल्ब लावण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...