AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराजवळ वारंवार साप निघतात का? मग हे झाड नक्कीच तुमच्या परिसरात कुठेतरी असणारच, एकदा चेक करा

काही घरं किंवा परिसर असा असतो, जिथे वांरवार साप निघतात. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? नेमके त्याच जागी वारंवार साप का दिसतात. तर त्यामागे प्रमुख्याने दोन गोष्टी कारणीभूत असतात.

घराजवळ वारंवार साप निघतात का?  मग हे झाड नक्कीच तुमच्या परिसरात कुठेतरी असणारच, एकदा चेक करा
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 15, 2026 | 10:04 PM
Share

उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात साप निघण्याच्या घटना अनेकदा घडतात, साप हा मुळातच थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्यांना उष्णता असाह्य होते. अशावेळी साप थंड जागेचा आणि जिथे लपण्यासाठी अडोसा असेल अशा जागेचा शोध घेत असतो. अशा जागेचा शोध सुरू असतानाच अनेकदा साप तुमच्या घरात शिरतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सर्पदंशाचा धोका देखील वाढतो. मात्र जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही साप दिसला तर घाबरून जाऊ नका, त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित जागी सोडतील. आपल्याकडे सापांबद्दल अनेक गैरसमज असतात, त्यामुळे आपण दिसला साप की लगेच मारतो, त्यामुळे भारतामधील सापाच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

तुम्ही अनेकदा असं देखील निरीक्षण केलं असेल की अशा काही विशिष्ट जागा असतात, जिथे वारंवार साप दिसतात. किंवा तुमच्या घरात देखील वारंवार साप येतात. असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर काही विशिष्ट झाडे हे तुमच्या परिसरात असतात. या झाडंच्या गुणधर्मामुळे साप त्यांच्याकडे आकर्षीत होतात. त्यामुळे त्या परिसरात तुम्हाला हमखास सापांचं दर्शन होतं. अशी झाडे जर तुमच्या परिसरात देखील असतील तर सतर्क राहणं हा त्यावरील सर्वात सोपा उपाय आहे. किंवा अशी झाडं ही घरापासून थोडी दूर लावावीत

काठी ठिकाणी बांबूच बेट असतं. बांबू ही अशी वनस्पती आहे, जिच्याकडे साप लगेच आकर्षित होतो. याचं मुख्य कारण म्हणजे बांबू बेट हे बाराही महिने हिरवगार असतं. बांबूच्या मुळाशी सापांना थडांवा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बांबूच्या मुळाशी येऊ बसतात. तसेच बांबूचं बेट हे मोठं असतं, बांबूच्या गळती झालेल्या पानांमुळे सापांना तिथे लपण्यासाठी सहज जागा मिळते. तसेच जिथे हे झाडं असतं तेथील जमीन देखील भुसभुशीत असते, तिथे सापांना सहज बिळ करता येत, त्यामुळे साप अनेकदा जिथे बांबूचं झाड असेल त्या परिसरात दिसतात.

Follow Us
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना