AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी ही माहिती एसआयटीला पाठवली आहे आणि… भोंदू खरात सोबतचा चाकणकरांचा फोटो ट्विट करत दमानियांचा मोठा दावा काय?

Rupali Chakankar : गुवाहाटीतील एक फोटो ट्विट करत दमानिया यांनी चाकणकर यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे.

मी ही माहिती एसआयटीला पाठवली आहे आणि... भोंदू खरात सोबतचा चाकणकरांचा फोटो ट्विट करत दमानियांचा मोठा दावा काय?
Kharat Chakankar and DamaniaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 15, 2026 | 9:55 PM
Share

भोंदू अशोक खरातचे काळ्या कारनाम्यांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादुटोणा केल्याचे, पैशांचा गैरव्यव्हार केल्याचे समोर आले आहे. भोंदू खरातचे अनेक नेत्यांसोबतही संबंध होते हेही समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचेही खरात आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचे समोर आले होते. आता गुवाहाटीतील एक फोटो ट्विट करत दमानिया यांनी चाकणकर यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंजली दमानिया यांचे ट्विट

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, काल या फोटोवर आणि गुवाहाटीवर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली त्यांनी फक्त तीनच नावांची उल्लेख केला आहे. रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात. पुढे दमानिया यांनी खालील 3 मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. 28 ऑगस्ट 2021 ला खरोखर 3 माणस गेली होती की 12 माणसे गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्वाची बाब म्हणजे, या तारखेनंतर दोन महिन्यात, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या.

2) बरं, त्या माध्यमाच्या बातमी मधे आणि एक तारीख होती, ती म्हणजे 30/06/2023. 30 जूनला रुपाली चाकणकर या पुन्हा गुवाहाटी ला गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या, आणि 2 जुलै ला परत आल्या. याच तारखेला अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि 2 जुलैला त्यांचा उप मुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला.

3) तिसरी गोष्ट, हा फोटो रॅडिसन ब्लूचा, गुवाहाटीचा नाही असे आत्तातरी वाटते. मी ही माहिती SIT ला पाठवली आहे आणि त्यांना विनंती की त्यांनी ह्याचा तपास करावा.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला गुरू मानले असल्याचे समोर आले आहे. तसेच चाकणकर यांनी त्यांची पाद्यपूजाही केली होती. त्यानंतर अलिकडेच चाकणकर यांची खरात प्रकरणात तपास यंत्रणांकडून चौकशीही करण्यात आलेली नाही.

Follow Us
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती