AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्लाह हिशोब करणार… तुरुंगात माजी पंतप्रधान इमराम खान यांची अशी अवस्था, पाकिस्तानी अभिनेत्रीरडली ओक्साबोक्सी! व्हिडिओने उडवली झोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जवळपास गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात आहेत, आता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती देखील समोर येत आहे.. त्यांची अवस्था पाहून पाकिस्तानी अभिनेत्री ओक्साबोक्सी रडली. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अल्लाह हिशोब करणार... तुरुंगात माजी पंतप्रधान इमराम खान यांची अशी अवस्था, पाकिस्तानी अभिनेत्रीरडली ओक्साबोक्सी! व्हिडिओने उडवली झोप
Imran Khan
| Updated on: Nov 21, 2026 | 1:14 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान गेल्या काही वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहे आणि आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. एवढंच नाही तर, त्यांच्या प्रकृतीची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु आहे. इमरान खान यांची अवस्था पाहिल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री मिशी खान हिने एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मिशी, इम्रान खान यांच्यासोबत होत असलेल्या वागणुकीबाबत रडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेटवर इम्रान खान यांच्या राजकीय प्रवासावरून आणि त्यांच्या सद्यस्थितीवरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, अभिनेत्री मिशी खान हिने तुरुंगवास भोगत असलेल्या इमरान खान यांना मूलभूत मानवाधिकार नाकारले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंस्टाग्रामवर pakistanicinemaa ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मिशी खान हिचा हा व्हिडिओ समोर आला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानसाठी इतकं काही केलं, मात्र आज त्यांच्यासोबत योग्य वर्तणूक केली जात नाहीये, असं अभिनेत्रीचे स्पष्ट मत आहे.

व्हिडिओमध्ये भावूक होत अभिनेत्री म्हणते, या गोष्टीसाठी व्यवस्था आणि सामान्य जनता या दोघांनाही अखेरीस अल्लासमोर उत्तर आणि हिशोब द्यावा लागेल. मिशी खान असं देखील म्हणाली की, इमरान खान यांनी कधीच स्वतःला आणि स्वतःच्या गरजांना महत्त्व दिलं नाही. त्यांनी कायम देशासाठी संघर्ष केला. म्हणून आता त्यांच्याबद्दल फार वाईट वाटत आहे…’, अखेर मिशी हिच्या व्हिडीओनंतर दोन गटात लोकं विभागली गेली आहेत. आता सोशल मीडियावर नेटकरी त्यांच्या राजकीय आणि खासगी प्रवासाबद्दल मत मांडत आहेत.

एवढंच नाही तर, व्हिडिओमध्ये प्रचंड भावुक दिसत असलेल्या मिशी खान हिने पाकिस्तानच्या विद्यमान सरकारवरही जोरदार टीका केली. व्हायरल क्लिपनुसार, अभिनेत्रीने स्पष्ट शब्दांत म्हटलं की, ‘जसं कराल तसं भराल’. इम्रान खान यांच्यावर खूप अन्याय केला जात असून, तुरुंगातील लोकांना त्यांच्या सलामचा प्रतिसाद देण्यासही मनाई करण्यात आली आहे, असा आरोप मिशी खान यांनी केला. हे अत्यंत चुकीचे असून अल्ला या गोष्टीचा हिशोब नक्कीच घेईल, असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट