Amit Satam : ठाकरे बंधुंना मुंबई बुक फेस्टिव्हलचं निमंत्रण का दिलं? मुंबई भाजप अध्यक्षांकडून खुलासा
Amit Satam : "युरोप मध्ये तस आपल्याकडे ही होताना पाहायला मिळतंय. या देशाचा इतिहास नष्ट करणे या षडयंत्रामध्ये विरोधी पक्ष देखील आहे. टिपू सुलतानची जयंती साजरी करुन अशा प्रकारच्या नरेटिव्हला इनकरेज केलं जातंय"

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई बुक फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं आहे. मराठी भाषेवरील “मधुरव – बोरू ते ब्लॉग” या नाटकाच्या प्रयोगालाही उपस्थित राहण्याचे साटम यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. एक्सवर राज आणि उद्धव ठाकरेंना उद्देशून त्यांनी एक ट्विट केलं आहे. ठाकरे बंधुंना दिलेल्या आमंत्रणावर अमित साटम बोलले आहेत. “मराठी भाषेचा 2000 वर्षाचा इतिहास सांगणारं नाटक आहे. 28 तारखेला प्रक्षेपण इकडे होईल, ज्या लोकांचं मराठी भाषेवर प्रेम आहे राजकारण केलय, त्यावर बोलतो तर मराठी भाषचा इतिहास कसा आहे ते जाणून घेण्यासाठी मी निमंत्रण दिलय” असं अमित साटम म्हणाले.
भाजपच्या मुंबईत अध्यक्षांनी थेट ठाकरे बंधुंना निमंत्रण दिल्याने राजकी वर्तुळात विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. ठाकरे बंधु आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील मोर्चा त्यानंतर सातत्याने आंदोलन सरकार विरोधात करण्यात आली. या निमंत्रणाकडे तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जातं आहे.
टिपू सुलतान जयंतीवर काय म्हणाले?
पुण्यात टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली. त्यावर सुद्धा अमित साटम बोलले. “या देशात फार मोठं षडयंत्र सुरु आहे. युरोप पासून सुरु झालय. हळू हळू स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून राजकीय गोष्टीं काबीज करणं होतं. युरोप मध्ये तस आपल्याकडे ही होताना पाहायला मिळतंय. या देशाचा इतिहास नष्ट करणे या षडयंत्रामध्ये विरोधी पक्ष देखील आहे. टिपू सुलतानची जयंती साजरी करुन अशा प्रकारच्या नरेटिव्हला इनकरेज केलं जातंय” असं अमित साटम म्हणाले. अमित देशमुखांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, “जो व्यक्ती टिपू सुलतान ची जयंती साजरी करण्यात मग्न आहे तो काय बोलणार दुष्काळवर आणि इतर गोष्टींवर”
राजस्थानमध्ये काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या
राजस्थानमध्ये काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या त्यावर त्यांना विचारण्यात आलं. “देशभरात वेगवेगळ्या निवडणुक होतात तसे निकाल येतात. पंचायत समितीच्या निवडणुकीत थोडं फार काही हाती लागलं त्याच श्रेय घेणं सुरु आहे” असं अमित साटम म्हणाले.
