AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिला, गर्लफ्रेंड दारात वरात घेऊन पोहोचली; थेट म्हणाली…..

बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्यानंतर गर्लफ्रेंड भडकली. त्यानंतर गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडच्या दारात वरात घेऊन पोहोचली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिला, गर्लफ्रेंड दारात वरात घेऊन पोहोचली; थेट म्हणाली.....
uttar pradesh news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 1:16 PM
Share

तुम्ही भारतातील अनेक लव्हस्टोरी ऐकल्या असतील. अनेक प्रेमीयुगुलाने पळून जाऊन देखील लग्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. गर्लफ्रेंडने लग्न करावं, यासाठी बॉयफ्रेंडने अनेक याचना केल्याच्या देखील घटना आहेत. परंतु उत्तर प्रदेशातून अजबच प्रकार समोर आला. बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्यानंतर गर्लफ्रेंड थेट वरात घेऊन दारात पोहोचली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशच्या देहरादूनमधील ही घटना आहे.  गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचल्याने परिसरात एकच राडा झाला. वादानंतर संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं. पोलिसंनी गुरुवारी रात्री दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दोघांमध्ये कोणतीही तडजोड झाली नाही. त्यानंतर दोघांना घरी पाठवलं. गुरूवारच्या दिवशी  तरुणीने तरुणाच्या विरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती. त्यानंतर घाईघाईने तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न एका दुसऱ्या तरुणीसोबत ठरवलं. त्यानंतर हे लग्न थांबवण्यासाठी तरुणीने पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तरुणाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अनेक वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात मागणी केली. या तरुणीने एक व्हिडिओ देखील व्हायरल केला. पुढे तरुणीने मदत मिळाली नाही, टोकाचा निर्णय घेण्याची धमकी पोलिसांना दिली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत तरुणीने सांगितलं की, ती देहारादूनची रहिवासी आहे. सात वर्षांआधी दिल्लीत मर्चंट नेव्हीत असलेला तरुण देहादून परिसरात यायचा. तरुणीच्या म्हणण्यानुसार, 2018 साली दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे 2019 साली तो तरुण तिला गावी घेऊन गेला. त्यावेळी तरुणी ही 16 वर्षांची होती. आता या तरुणीने या तरुणावर गंभीर आरोप केला. लग्न करण्याचं वचन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला. तरुणीने आरोप केला की, लग्नाविषयी विचारल्यानंतर तरुणी काही ना काही कारण देऊन पुढे ढकलत होता. त्याच काळात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत राहिला.

काही दिवसांपूर्वी त्याचे लग्न दुसऱ्या तरुणीशी ठरलं. त्यानंतर ही तरुणी तिची बहीण, कुटुंबीयांसोबत थेट तिच्या गावी गेली. त्यानंतर तरुणीने पोलीस स्टेशनला जाऊन आरोप केला की, तरुणाच्या कुटुबीयांनी चुकीची वागणूक दिली. त्यानंतर घरात हाकलून दिले. तरुणीने नंतर पोलीस स्टेशन गाठलं. तिने पोलीस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. एकीकडे आता तरुण हा दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत व्यग्र आहे. त्याची शनिवारी वरात निघणार आहे.

Follow Us
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा