AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय” म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरची तीन लाखांची फसवणूक, काय नेमके प्रकरण?

पुणे येथील एका ४३ वर्षांच्या डॉक्टर महिलेची सायबर चाच्यांनी नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय असे म्हणत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पुणे येथील एका ४३ वर्षांच्या डॉक्टर महिलेची सायबर चाच्यांनी नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय असे म्हणत फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरची तीन लाखांची फसवणूक, काय नेमके प्रकरण?
cyber crime in pune
| Updated on: Nov 20, 2026 | 5:54 PM
Share

 दीपक कापरे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : पुण्यातील एका ४३ वर्षी महिला डॉक्टरला सायबर चाच्यांनी तीन लाखांना लुबाडल्याची घटना घडली आहे. या महिलेला नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय म्हणतोय असे म्हणून फसवण्यात आले. आपण सायबर सेल ऑफ इंडियामधून चौधरी आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा असिस्टंट बोलतोय.तुमचे नाव हे मनि लाँड्रीग आणि टेररिस्ट फंडींगच्या केसमध्ये आले आहे. जर वाचायचे असेल तीन लाख बँकेत ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर या महिलेने हे पैसे ट्रान्सफर केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुण्यातील महिला डॉक्टरला एक फोन आला आणि त्यातील व्यक्तीने आपण मी सायबर सेल ऑफ इंडियामधून चौधरी आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा असिस्टंट बोलतो आहे असे सांगितले. दरम्यान,सायबर चोरट्यांनी फिर्यादींना “तुम्ही अवैध जाहीरातबाजी आणि अश्लील मेसेज पाठवुन पैसे कमवत आहात.तुमचे मनि लाँड्रिंग आणि टेरिरिस्ट फंडींगच्या केसेसमध्ये नाव आले आहे. असे घाबरवून फिर्यादी यांना अटकेची भीती घातली गेली.अटक टाळायची असेल तर तुम्हाला काही रक्कम सांगितलेल्या बँक खात्यात भरावी लागेल असे सांगितले.घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादींनी सायबर चोरट्यांच्या भूल थापाला बळी पडून त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर तीन लाख रुपये ट्रान्स्फर केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला.फोनवर समोरील व्यक्तीने “मी सायबर सेल ऑफ इंडियामधुन चौधरी आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा असिस्टंट बोलतोय” असं सांगितले. तसेच काही वेळात आणखी एका नंबरवरून सायबर चोरट्यांनी “आपण मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी बोलत असून तुमचे आधार कार्ड एका नंबरला लिंक आहे असे सांगितले.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील हे सध्या नागपूर शहर पोलिस दलाचे आयुक्त आहेत. त्यांच्या नावाचा वापर करुन सायबर चाच्यांनी या महिलेला डिजिटल अरेस्टची धमकी दिली होती. डॉक्टर असलेल्या या महिलेची अशा प्रकारे फसगत झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात आता याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय