AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs CSK : कार्तिकचा तडाखा, शिवमचा फिनिशिंग टच, लखनौसमोर 188 रन्सचं टार्गेट, चेन्नई रोखणार?

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings 1st Innings, IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध विजयी होणं गरजेचं आहे. त्यामुळे चेन्नई लखनौला पराभूत करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LSG vs CSK : कार्तिकचा तडाखा, शिवमचा फिनिशिंग टच, लखनौसमोर 188 रन्सचं टार्गेट, चेन्नई रोखणार?
Shivam Dube and Prashant Veer LSG vs CSKImage Credit source: Bcci
| Updated on: May 15, 2026 | 10:11 PM
Share

कार्तिक शर्मा याने केलेली अर्धशतकी खेळी आणि ऑलराउंडर शिवम दुबे याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 59 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्ससमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शिवम दुबे याने एकाना स्टेडियममध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 2 फोर ठोकून चेन्नईसाठी 23 धावा जोडल्या. त्यामुळे चेन्नईला 180 पार मजल मारता आली. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. आता चेन्नईचे गोलंदाज या धावांचा बचाव करत प्लेऑफमधील आव्हान कायम राखणार का? याकडे यलो आर्मीच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लखनौने टॉस जिंकला

लखनौने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. उर्विल पटेल आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनी चेन्नईला संयमी सुरुवात मिळवून दिली. मात्र त्यानंतर चेन्नईने झटपट 2 विकेट्स गमावल्या. लखनौने चेन्नईला 31 धावांवर पहिला झटका दिला. ऋतुराज गायकवाड याने 13 धावा केल्या. तर संजू सॅमसन याने 20 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. ऋतुराज आणि संजू दोघांना सुरुवात तर मिळाली. मात्र दोघेही नवख्या आकाश सिंहसमोर अपयशी ठरले. आकाशने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

कार्तिक शर्माची जबरदस्त बॅटिंग

त्यानंतर उर्विल पटेल आणि कार्तिक शर्मा या दोघांनी चेन्नईला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ओव्हरनंतर लखनौने चेन्नईला तिसरा झटका दिला. उर्विल 6 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कार्तिक शर्मा याने डेवाल्ड ब्रेव्हीस याच्यासह चौथ्या विकेटसाठी चेन्नईच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी केली. कार्तिक आणि डेवाल्डने 44 चेंडूत 70 धावा जोडल्या. डेवाल्ड सेट झाला होता. मात्र मोहम्मद शमीने याने निर्णायक क्षणी डेवाल्डला आऊट केलं. डेवाल्डने 16 बॉलमध्ये 2 सिक्ससह 25 रन्स केल्या.

लाईव्ह स्कोअरकार्ड

शिवमचा फिनिशिंग टच

डेवाल्डनंतर चेन्नईने कार्तिक शर्मा याच्या रुपात पाचवी आणि शेवटची विकेट गमावली. कार्तिकने 42 बॉलमध्ये 72 रन्स केल्या. कार्तिकने या दरम्यान 5 सिक्स आणि 6 फोर लगावले. तर सहाव्या विकेटसाठी शिवम दुबे आणि प्रशांत वीर या दोघांनी 24 बॉलमध्ये नॉट आऊट 45 रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने 45 पैकी 23 धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये जोडल्या.

शिवमने 16 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 32 रन्स केल्या. शिवमने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर लगावले. तर प्रशांत वीर याने 10 बॉलमध्ये 1 फोरसह 13 रन्स केल्या. लखनौसाठी आकाश सिंह याने 3 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद शमी आणि शाहबाझ अहमद या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय