AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छातीत जळजळ होतेय म्हणून कलिंगड खाल्ले, वडिलांचा मृत्यू, मुलाची तब्येत नाजूक

मुंबईतील पायधुनीत अख्खे कुटुंबच कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशात तशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

छातीत जळजळ होतेय म्हणून कलिंगड खाल्ले, वडिलांचा मृत्यू, मुलाची तब्येत नाजूक
Watermelon Death
| Updated on: May 15, 2026 | 9:58 PM
Share

मुंबईतील पायधुनीत कलिंगड खाल्याने आई-वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे प्रकरणानंतर मध्य प्रदेशातील श्योपुरमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. येथे कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हडकंप माजला आहे. त्यामुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या कलिंगडांवर प्रश्न केला जात आहे. लोकांना वाटत आहे की कलिंगडता केमिकल असल्याचा संयश व्यक्त होत आहे. मात्र, मृत्यूचे खरे कारण आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सक्रीय झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील सुसनेर येथील निवासी इंद्र कुमार परिहार ( 43 ) हा आपल्या कुटुंबासह श्योपूर येथे पेट्रोल पंपासमोर भाड्याने राहातो. तो पेशाने ड्रायव्हर होता. गुरुवारी रात्री पिता-पुत्राची तब्येत खराब झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी इंद्र कुमार आणि त्याचा २१ वर्षीय मुलगा विनोद यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

त्या दोघांना तातडीने श्योपुर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्रकुमार यांची तब्येत जास्त खराब झाल्याने त्या कोटा येथे रेफर केले. मात्र, रस्त्यातच त्याचे प्राण गेले. तर मुलगा विनोद याची स्थिती नाजूक आहे. या घटनेनंतर कुटुंबात मातम पसरले. इंद्र सिंह परिहार याच्या पश्चात त्याची पत्नी संगिता, मुलगा विनोद ज्याची तब्येत नाजूक बनलेली आहे. या कुटुंबात महिला सदस्य राधिका देखील त्यांच्यासोबत राहाते.

घटनेची सूचना मिळताच कुटुंब इंद्र कुमार परिहार याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इटावा येथे गेले आहे. या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. जिल्हा हॉस्पिटलचे सिव्हील सर्जन डॉ. आरबी गोयल यांनी सांगितले की दोन लोकांना सकाळी गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कलिंगडने मृत्यू झाला असे म्हणता येणे शक्य नाही. पोटात इन्फेक्शन झालेले असू शकते. डॉक्टर या तपासणी करत असून नंतरचे नेमके कारण कळू शकेल असे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षीही कलिंगड खाल्ल्याने एकाचा मृत्यू

तर कुटुंबियांनी सांगितले की या कुटुंबाने खातौली तिराहा येथून गुरुवारी सायंकाळी कलिंगड खरेदी केले होते. कुलरमध्ये थंड होण्यासाठी ठेवले होते, नंतर ते खाल्ले. मध्य प्रदेशात गेल्या वर्षीही कलिंगड खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना छिंदवाडा येथे घडली होती. येथील बडी माता मंदिराच्या जवळ राहणाऱ्या २७ वर्षीय सिद्धार्थ ताम्रकार यांचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ याने दुपारी जेवणानंतर कलिंगड खाल्ले आणि नंतर तो झोपला. जेव्हा तो उठला नाही तेव्हा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेले तेव्हा त्याला मृत घोषीत केले.

Follow Us
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात