AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलिंगडात कसे पोहचले उंदीर मारण्याचे औषध ? पोलिसांपुढे पेच कायम

कलिंगड खाल्ल्याने मुंबईतील पायधूनीतील येथील एका कुटुंबाचा मृत्यू झाल्याचा प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण लागले आहे. त्यांच्या पोटात उंदराचे विष जरी सापडले असले तरी हे विष कलिंगडात पोहचले कसे ? याचा गुंता कायम आहे.

कलिंगडात कसे पोहचले उंदीर मारण्याचे औषध ? पोलिसांपुढे पेच कायम
tarbuj se maut
| Updated on: May 08, 2026 | 11:10 PM
Share

दक्षिण मुंबईतील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास गुंतागुंतीचा झाला आहे. फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (FSL) हे स्पष्ट केले की मृत्यू कलिंगडातील झिंक फॉस्फाईड म्हणजे उंदीर मारण्याच्या औषधाने झाला आहे.,परंतू सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे विष कलिंगडात कसे पोहचले ? हे कळल्याचा मार्ग पोलिसांना सापडलेला नाही.

ताज्या घडामोडीनुसार पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील घराच्या तपासणीत पोलिसांना उंदीर मारण्याची एक हर्बल औषधाची बाटली सापडली आहे. सुरुवातीच्या तपासात उघडकीस आले की या हर्बल बाटलीत झिंक फॉस्फाईड सापडलेले नाही. घरात जर हर्बल औषध सापडले असेल तर फळ आणि मृतांच्या व्हीसेरात उंदीर मारण्याचे केमिकल कोठून आले.

पोलिस आता या तपासात अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. या कुटुंबावर कोणतेही मोठे कर्ज नव्हते. त्यांचा खानदानी दुकान होते. ज्यातून मिळणाऱ्या भाड्यात त्यांचा घराचा खर्चा आणि चाळीचा खर्च निघत होता. पोलिसांना आतापर्यंत हत्या किंवा कोणत्या कटकारस्थानाचा पुरावा मिळालेला नाही. घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळालेली नाही. तर कुटुंबाची कोणाशी दुश्मनी असल्याचेही पुढे आलेले नाहीय

नेमकी घटना काय ?

२६ एप्रिलच्या रात्री अब्दुल डोकडिया ( ४४), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि दोन मुली आयशा (१६) आणि जैनब (१३ ) यांनी चिकन बिर्याणी खाल्ल्यानंतर काही वेळाने कलिंगड खाल्ले होते. रात्री त्यांना फूड पॉझजनिंग झाले. डॉक्टरांनी औषधे दिली मात्र तरीही तब्येत बिघडत गेली. एका मुलीला रुग्णालयात मृत घोषीत केले. तर उर्वरित तिघांचा मृत्यू जे.जे.रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिस आता काय करणार ?

मृतांच्या लिव्हर, किडनी आणि स्वादुपिंडात झिंक फॉस्फाईड सापडले आहे. उरलेल्या कलिंगडाच्या नमुन्यातही ते सापडले आहे. चिकन बिर्याणीत कोणतेही विषारी घटक सापडले नाहीत. मुंबई पोलिस आता या प्रकरणात फोरेन्सिक तज्ज्ञांशी पुन्हा सल्लामसलत करणार आहेत. आता कलिंगड खरेदी करताना किंवा बाजारात यात कलिंगडात कोणी विष मिसळले का ? वा घरात कोणाकडून अजाणतेपणी किंवा अन्य प्रकारे हे विष जेवणात मिक्स केले असेल का ? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?