AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिर्याणीतून विषबाधा की कलिंगडातून, पायधूनीच्या घटनेवर तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे काय ?

tarbuj se maut : कुठली गोष्ट खाण्यापूर्वी नीट खात्री केली पाहिजे की ती गोष्ट ताजी आहे का? कोणत्याही फूड पॉयझनिंगमध्ये पहिले लक्षण उलटी होणे, लूज मोशन होणे, मळमळ होणे, पोट फुगणे ताप येणे अशी लक्षणे पाहायला मिळतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बिर्याणीतून विषबाधा की कलिंगडातून, पायधूनीच्या घटनेवर तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे काय ?
tarbuj se maut
| Updated on: Apr 28, 2026 | 8:11 PM
Share

बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने मुंबईतील पायधुणी येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींचा दुर्दैवी अंत झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबईतील भायखळा, पायधुनी परिसरातील कलिंगड विक्रेते नाहीसे झाले आहेत. अनेकांनी कलिंगडावर बहिष्कार टाकला आहे. या घटनेत बिर्यायी आणि नंतर कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होते काय यावरुन विविध अफवा पसरल्या जात आहेत.या बाबत डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे पाहूयात…..

या संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.उन्मेष टाकळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जेव्हा आपण बिर्याणी खातो, तेव्हा त्याच्यामध्ये हाय फॅट कंटेंट असतात. त्याच्यावर जर आपण कलिंगड खाल्लं तर शुगर आणि पाण्याचे व्हॅल्यूम जास्त असते. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि पोटामध्ये प्रेशर यायला लागतं. ते पुढे म्हणाले की पोटावर प्रेशर आला तर उलटी होऊ शकते छातीमध्ये उलटी जाऊ शकते. पोटावर प्रेशर आल्यामुळे हृदयाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अटॅक येण्यासारखी लक्षणे होऊ शकतात असे डॉ. टाकळकर यांनी म्हटले आहे.

दुसरा मुद्दा असा आहे की बिर्याणी आणि कलिंगड यांच्या अनुषंगाने काही इश्यू असतील तर फूड पॉयझनिंग असेल जास्त वेळ कलिंगड उघडे ठेवले असेल.याच्यामुळे सुद्धा उलट्या लुझ मोशन होणे या कॉम्बिनेशनमुळे पोटात गॅस तयार होऊन पोट एकदम फुगून जाऊ शकते हे दुसरे कारण आहे.काही लोकांना त्याची एलर्जी असते ते एक दुसरे कारण आहे आणि काही लोक जे वयस्कर आहेत त्यांना ऑलरेडी डायबिटीज बीपी आणि हार्टचा इशू आहे अशा लोकांनी बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्लं तर पोटामध्ये फुगून छातीवर प्रेशर द्यायला लागतं त्याच्यामुळे हृदयाचा झटका येणे किंवा तीव्र अटॅक येणे.यात लवकर ट्रिटमेंट घेतली तर बऱ्याच वेळेस यातून पेशंट वाचू शकतो असेही डॉ.उन्मेष टाकळकर यांनी म्हटले आहे.

कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाला असेल असे वाटत नाही. प्राथमिक दृष्ट्या असे दिसते की फूड पॉयझनिंग झाले असावे. मात्र त्या बिर्याणीमध्ये फूड पॉयझनिंगचे जीवाणू होते का ? त्यामुळे विषारी पदार्थ तयार झाला असावा. मात्र, आजकाल पिकवण्यासाठी कलिंगड रसायने वापरली जातात. ते रसायन कलिंगडमध्ये टोचलं होता का ? याचा तपास आता एफडीए करेल. मात्र कलिंगड खाल्लं असतं तर फार फार मळमळ आणि उलटी होऊ शकते. मात्र मृत्यू होणे अशक्य आहे असे अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे.

बराच काळ कापून ठेवलेली फळे खाऊ नये

काल मुंबईत जो प्रकार झाला. त्यानंतर व्हॉटसअपच्या माध्यमातून अनेक संदेश आमच्यापर्यत आले आहेत. अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे कलिंगड खाणे लोक टाळत आहेत. माझं नागरिकांना आवाहन आहे की उन्हाच्या दिवसात 6 तासापेक्षा जास्त कापून ठेवलेले कलिंगड खाऊ नये. कलिंगड विकत घेताना जर कापल्यानंतर लाल कलिंगड दिसत असेल आणि गोड लागत नसेल तर ते कलिंगड केमिकल युक्त पिकवलेले आहे असे समजून ते खाणे टाळलं पाहिजे. जेव्हा फळे कापून जास्त वेळ ठेवतो तेव्हा ती उन्हाच्या दिवसात खराब होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे कापून ठेवणे टाळावे. ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचा तपास पोलिस आणि डॉक्टर करीत आहेत त्यावर अधिक बोलण योग्य नाही. परंतू बिर्याणीनंतर कलिंगड खाणे चुकीचे नाही असे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ.तुषार पालवे यांनी म्हटले आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच