AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा

Rahul Gandhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यावेळी न्यायालयात उपस्थित होते.

Rahul Gandhi : अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा
Rahul Gandhi
| Updated on: Oct 26, 2026 | 12:08 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीच्या प्रकरणात राहुल गांधी यांची निर्दोष सुटका झाली आहे. सुल्तानपुर न्यायालयाने सोमवारी राहुल गांधी यांची निर्दोष सुटका केली. राहुल गांधी यावेळी न्यायालयात उपस्थित होते. 2018 साली भाजप नेते विजय मिश्र यांनी याचिका दाखल केली होती. आधी हे प्रकरण सिविल कोर्टात मग एमपी-एमएलए कोर्टात गेलं. एमपी-एमएलए कोर्टाचे मॅजिस्ट्रेट शुभम वर्मा यांनी निकालाच्या दिवशी राहुल गांधी यांना उपस्थित रहायला सांगितलं होतं.

मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी बंगळुरुमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी राहुल गांधींनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि वर्तमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. राहुल गांधींच्या या टिप्पणीला मानहानीकारक ठरवून भाजपं नेते आणि सुल्तानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती.

तीन साक्षीदार केले सादर

कोर्टात सुनावणी झाल्यानंतर 27 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधी यांना आरोपी मानून समन जारी करण्यात आलेलं. 20 फेब्रुवारी 2024 रोजी राहुल गांधी स्वत: सुल्तानपूर कोर्टात हजर राहिले. त्यांना 25-25 हजार रुपयांच्या दोन मुचलक्यांवर जामिन मंजूर झालेला. राहुल गांधी यांनी हे आरोप फेटाळून लावताना हे सत्ताधारी पक्षाचं कारस्थान असल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने सुनावणी दरम्यान तक्रारदार विजय मिश्रा, अनिल मिश्रा आणि रामचंद्र दुबे तीन साक्षीदारांच्या जबानी नोंदवल्या.

Follow Us
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा