Raj Thackeray | महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; राज ठाकरे यांचा इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राची अवस्था सध्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी राज्याची तुलना थेट ‘आयसीयू’शी केली. राज ठाकरे म्हणाले, “आजची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राची अवस्था सध्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी राज्याची तुलना थेट ‘आयसीयू’शी केली. राज ठाकरे म्हणाले, “आजची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे. जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला आपण सूज म्हणू शकतो आणि ही इतकी घाणेरडी सूज आहे की अनेकांना वाटतं की जे काही चालू आहे ते कायमस्वरूपी आहे. पण कायमस्वरूपी काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते.”
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा देत म्हटले की, “सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी आहे.” देशात दीर्घकाळ सत्ता उपभोगलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दाखला देत ठाकरे म्हणाले की, “एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती. 57 -58 वर्षे देशावर राज्य करणारा पक्ष आज चाचपडताना दिसतोय. तीच परिस्थिती आता सत्तेत असलेल्या पक्षाची देखील होणार आहे.” राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Feb 20, 2026 04:02 PM
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल

