तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, नाशिकमध्ये मोदी काय म्हणाले?
'नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं आहे, अशा शब्दांत मोदींनी निशाणा साधला. तर “बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर उभं राहावं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जम्मू काश्मीरमधून आर्टिकल ३७३ रद्द व्हावं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण याची चीड नकली शिवसेनेला येत आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये आज जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी पुन्हा नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी म्हणून घणाघात केल्याचे पाहायला मिळाले. मोदी म्हणाले, ही नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचं काँग्रेसमध्ये विलय होणार आहे. जेव्हा या नकली शिवसेनेत विलय होईल. तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येणार. कारण बाळासाहेब म्हणायचे, शिवसेना काँग्रेस बनल्याचं कळलं तेव्हा शिवसेना बंद करेल. म्हणजे नकली शिवसेनेचा आतापत्ताही राहणार नाही. मला वाटतंय हा विनाश होत आहे, त्याने बाळासाहेब दुखी होत असतील. नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं आहे, अशा शब्दांत मोदींनी निशाणा साधला. तर “बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर उभं राहावं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जम्मू काश्मीरमधून आर्टिकल ३७३ रद्द व्हावं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण याची चीड नकली शिवसेनेला येत आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला ठोकर मारली. नकली शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला. काँग्रेसचे लोक मंदिरावरून अनापशनाप बोलत आहे. नकली शिवसेना चूप आहे. यांची पार्टनरशीप ही पापाची पार्टनरशीप आहे. महाराष्ट्रासमोर यांचं पाप एक्सपोज झालं आहे”, अशी टीका मोदींनी केली.