दो हजार ‘जेन Z’ आणि ‘जेन अल्फा’शी संवाद; मोहन भागवत यांच्या संवादाकडे देशाचं लक्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जेन जी आणि जेन अल्फा पिढीशी भागवत यांचा संवाद होणार आहे. यावेळी भागवत काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या 6 ऑगस्यट रोजी जेन जी आणि जेन अल्फाशी संवाद साधणार आहेत. इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू यूनाइट नेशन्सने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. संस्थेला 15 वर्ष होत असल्याने हा कार्यक्रम होत आहे. मुंबईच्या मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला देशातील 100 हून अधिक शहरातील 15 ते 19 वयोगटातील दोन हजार विद्यार्थी भाग घेणार आहेत.
यंदा या संमेलनाची थीम द रोल ऑफ यूथ इन यूनायटिंग द वर्ल्ड : द इंडियन ठेवण्यात आली आहे. या विषयांतर्गत विद्यार्थी राष्ट्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर आपलं मत मांडू शकणार आहे. संघटनेचे संस्थापक ऋषभ शाह यांनी याबाबतची माहिती दिली. हे काही नवीन आयोजन नाही. संस्था गेल्या 15 वर्षापासून ऑगस्टमध्ये दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असते, असं ऋषभ शाह यांनी म्हटलं आहे.
आम्ही दरवर्षी 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. भारत आणि इतर देशातील 11 ते 19 वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यंदा या ग्रुपमध्ये जेन जी आणि जेन अल्फाचा समावेश करण्यात आला आहे, असंही शाह यांनी स्पष्ट केलं.
चार दिवस कार्यक्रम
हा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे. या कार्यक्रमात जेन जी आणि जेन अल्फा वयोगटातील विद्यार्थी भाग घेणार आहेत. तसेच ते वादविवादातही भाग घेतील. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मुख्य वक्ते येतात आणि मार्गदर्शन करतात. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होते. भारताच्या 108 शहरात आणि 15 देशात हीच पद्धत वापरली जाते. त्यानंतर ऑगस्टमध्येच या कार्यक्रमाचा समारोप होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
VIDEO | On RSS chief Mohan Bhagwat’s August 6 interaction with Gen Z and Gen Alpha, I.I.M.U.N Founder Rishabh Shah says, “This may be new for many people, but our organisation has been working for the past 15 years. Every year, our culmination event is held in August, between… pic.twitter.com/Jnsk6LIFZR
— Press Trust of India (@PTI_News) August 4, 2026
सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमात व्हर्च्युअल नव्हे तर प्रत्यक्षात सहभागी होणार आहे. आम्ही यापूर्वी 2016 आणि 2026मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांना कार्यक्रमाला आमंत्रित करून तरुणांशी संवाद साधण्याची विनंती केली होती. त्यावेळी ते आले होते आणि त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं होतं. आता परत ते आमच्या कार्यक्रमात येत आहेत, याचा आम्हाला आनंदच आहे, असं त्यांनी सांगितलं.
अनेकांनी संबोधित केलं
यापूर्वी विविध क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींनी आमच्या संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आमच्या लीडरशीप टीमशी संवाद साधला होता. नव्या पिढीपर्यंत भारतीयतेची भावना पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.