AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्र…आता टीम इंडियापुढे पर्याय नाही… मोहसिन नक्वींकडून पदकं स्वीकारावीच लागणार? कारण समोर

Team India Mohsin Naqvi Row : टीम इंडिया आणि मोहसिन नक्वी यांच्यातील वाद अनेकदा आता समोर आले आहेत. पाकिस्तानचे मोहसिन नक्वी यांच्याकडे भारताच्या दोन ट्रॉफी आहेत. आता आशियाई स्पर्धेतही पुन्हा तेच सगळं प्रकरण घडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

अर्र...आता टीम इंडियापुढे पर्याय नाही... मोहसिन नक्वींकडून पदकं स्वीकारावीच लागणार? कारण समोर
team india mohsin naqvi rowImage Credit source: social media
| Updated on: Sep 19, 2026 | 4:56 PM
Share

आता आशियाई खेळांना सुरुवात होणार आहे. जपानमध्ये आशिया चषकासाठी 45 देशांमधून जवळपास 11 हजार खेळाडू पोहोचणार आहेत. विविध पदक जिंकण्यासाठीच्या उद्देशाने हे खेळाडू त्यांचा खेळ खेळतील. भारताकडूनही यासाठी जवळपास 500 खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतासाठी अनेक खेळांमध्ये पदकं निश्चित मानली जात आहेत. त्यामध्ये क्रिकेट सर्वात वर आहे. मागील आशियाई खेळांप्रमाणेच भारताचे पुरुष आणि महिला संघ विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण असं असलं तरी जपानमध्येही भारत आणि पाकिस्तानचे मोहसिन नकवी यांच्यातील प्रकरणाची पुनरावृत्ती होणार का अशी चर्चा आहे. यावेळीही भारतीय संघ नक्वींकडून पदक स्वीकारणार का नाही याबाबत सस्पेन्स आहे.

सप्टेंबर 2025मध्ये टीम इंडियाच्या पुरुष संघाने आशिया कप जिंकला होता. पण तेव्हा एशियन क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष पाकिस्तानचे मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ही ट्रॉफी ACC च्या ऑफिसमध्येच आहे. हाच प्रकार गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळाला. जेव्हा महिला टीम इंडियाने आशिया कप जिंकला. तेव्हा मोहसिन नक्वी परत एकदा ट्रॉफी द्यायला मैदानावर आले. पण बक्षिस वितरण सोहळ्यामध्ये त्यांना बराच वेळ ताटकळत बसाव लागलेलं. टीम इंडियाने याहीवेळी त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचं धोरण स्वीकारलं. त्यामुळे भारताची ही दुसरी ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयामध्ये पोहोचली.

पण आता प्रश्न उसा उपस्थित होतोय की, यावेळीही एशियन गेम्समध्ये हीच गोष्ट परत होणार की कारण की बक्षिस वितरण सोहळ्यात मोहसिन नक्वी उपस्थित राहणार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता टीम इंडिया वेगळी भूमिका घेणार का नाही? याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दल बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं नाही. दरम्यान, एशियन गेम्समध्ये मेडल वितरणासाठी एक अध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली कमिटी नेमली जाते. या कमिटीना नकार देणं जरा कठीण मानलं जातं. 2014मध्ये भारतीय बॉक्सर सरिता देवी यांनी मेडल वितरणावेळी त्यांचं ब्रॉन्झ स्वीकारल्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका वर्षाची बंदी लावली होती. एवढच नाही तर पंचांचंही निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान काही काळानंतर सरितादेवी यांनी मेडल स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.

Follow Us
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव