AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीतील बड्या मंत्र्याला जबर धक्का, बँकेच्या संचालकपदापासून केलं दूर, थेट RBI च्या आदेशानंतर कारवाई!

सतीश जाधव यांनी 25 मे 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक तक्रार दाखल केली होती. सतीश जाधव हे लातूर जिल्हा बँकेचे सभासद आहेत. एखाद्या व्यक्तीने दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालकपद भूषवलेले असेल तर त्या व्यक्तीला पुढची निवडणूक लढवता येत नाही, तसा नियम आहे.

महायुतीतील बड्या मंत्र्याला जबर धक्का, बँकेच्या संचालकपदापासून केलं दूर, थेट RBI च्या आदेशानंतर कारवाई!
babasaheb patil and latur bankImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 4:45 PM
Share

Latur Bank RBI Decision : राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा दणका बसला आहे. बाबासाहेब पाटील यांच्यावर आरबीआयने बडतर्फीची कारवाई केली आहे. गेल्या 10 वर्षापासून बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यामुळे त्यांनी आरबीआयच्या नियमाच उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. याच कारणामुळे त्यांना संचालकपदावरून हटवण्यात आले आहे. या कारवाईनंतर बाबासाहेब पाटील यांनी थेट न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

सतीश जाधव यांनी 25 मे 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक तक्रार दाखल केली होती. सतीश जाधव हे लातूर जिल्हा बँकेचे सभासद आहेत. एखाद्या व्यक्तीने दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालकपद भूषवलेले असेल तर त्या व्यक्तीला पुढची निवडणूक लढवता येत नाही, तसा नियम आहे. हाच नियम बाबासाहेब पाटील यांनी मोडला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 संचालक मंडळातील 8 संचालक 10 वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर आहेत. बाबासाहेब पाटील यांचाही यात समावेश आहे, असं या तक्रारीत सांगितलं होतं.

सात संचालकांनी दिला होता राजीनामा

याच तक्रारीची आरबीआयने दखल घेतली. त्यानंतर आता आरबीआयने बाबासाहेब पाटील यांना संचालकपदावरून दूर केलं आहे. सतीश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेच्या आठ पैकी एकूण सात संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बाबासाहेब पाटील यांनी मात्र संचालकपदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे आरबीआय यांनी त्यांना पदावरून हटवले आहे.

बाबासाहे पाटील थेट न्यायालयात जाणार

आता बाबासाहेब पाटील हे न्यायालयात दाद मागणार आहेत. आरबीआयच्या निर्णयाला ते आव्हान देणार आहेत. त्यामुळे आता संचालकपदाच्या लढाईत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी