AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 महिन्यात 3 जणांचा मृत्यू…IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांचा एकच संताप, नामांकित शिक्षण संस्थेत नेमकं काय घडतंय?

पवईच्या आयआयटी मुंबईत 7 महिन्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे.

7 महिन्यात 3 जणांचा मृत्यू...IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांचा एकच संताप, नामांकित शिक्षण संस्थेत नेमकं काय घडतंय?
iit mumbaiImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 19, 2026 | 4:53 PM
Share

पवईच्या आयआयटी मुंबई या शिक्षण संस्थेचा देशातील नामांकित शिक्षण संस्थेत समावेश होतो. परंतु मागील काही महिन्यांपासून या संस्थेत अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी साहिल वाकोडे नावाचा विद्यार्थी परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीवरून कॉपी करताना आढळला. त्यामुळे संस्थेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साहिलने घाबरून टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितले जात आहे. या घटनेने पवईच्या आयआयटी मुंबईत एकच खळबळ उडाली. मागील सात महिन्यात आयआयटी मुंबईतील ही तिसरी घटना आहे. या घटनेच्या विरोधात 400 हून विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये जमत निषेध नोंदवला. त्यांनी या घटनेवरून कॉलेज प्रशासनाला जाब विचारला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा साहिल वाकोडे हा शुक्रवारी सायंकाळी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो काढणे आणि प्रश्न मिळवण्यासाठी चॅटजीपीटीवर अपलोड करताना पकडला गेला. आयआयटी मुंबईच्या प्रशासनाच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढली होती. या घटनेचा तुझ्या करिअरवर कोणताही वाईट परिणाम होऊ देणार नाही, अशी समजूत काढली. समुपदेशकानंतर साहिल हॉस्टेलवर गेला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह हॉस्टेलच्या रुममध्ये सापडला.

साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, साहिलला एका वर्ष निलंबन करण्याची धमकी दिली होती. हॉस्टेल रिकामे करून कॅम्पसच्या बाहेर जाऊन राहण्यास सांगितलं होतं. कॉलेज प्रशासनाच्या कारवाईनंतर बीटेकच्या कोर्सला 4 वर्षांहून अधिक काळ लागला असता. त्यामुळे मानसिक तणावात येऊन साहिलने टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आयआयटी मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही कारवाईची मागणी करत आहोत. ही पहिली घटना नसून मागील दोन महिन्यातही दोघांचा मृत्यू झाला. वारंवार या घटना का घडत आहेत, यामागील काय कारणे आहेत. याप्रकरणी आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवलं जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी