AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, काचा फोडल्या; लोकांना चकवा देऊन पळ काढला

भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. काजल ही एका कार्यक्रमाला आली होती, त्यावेळी ही घटना घडली.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, काचा फोडल्या; लोकांना चकवा देऊन पळ काढला
actress car attackImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 19, 2026 | 5:33 PM
Share

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून मोठी बातमी हाती आली आहे. भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीच्या कारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिहारच्या एका शोरूमच्या उद्घाटनाला अभिनेत्री काजल राघवानी पोहोचली होती. या कार्यक्रमात गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. त्यानंतर यातील काही लोकांनी काजल राघवानीवर हल्ला केला. त्यांनी तिच्या कारच्या काचा फोडल्या.

कार्यक्रमस्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. यानंतरही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अभिनेत्री काजल राघवानीची झलक पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. गर्दीतील लोकांनी तिच्या कारवर हात आणि दगडाने हल्ला करत काचा फोडल्या. त्यानंतर शोरूम संचालकाने लोकांना चकवा देत अभिनेत्री काजल राघवानीला सुरक्षित ठिकाणी नेलं. काजल राघवानीसोबत पाटण्याहून आलेले 12-13 बाऊन्सर होते. परंतु शोरूमजवळ प्रचंड गर्दी झाली होती. तिला अंडरग्राऊंड रस्त्याने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. एका बाऊन्सरने म्हटलं की, कार्यक्रमाला भरपूर गर्दी होती. त्यामुळे ऐन गर्दीत काजलला मागच्या रस्त्याने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. परंतु तिच्या कारवर लोकांनी हल्ला केला . कार्यक्रमाच्या संयाजकाने म्हटलं की, भोजपुरी अभिनेत्री काज राघवानी या कार्यक्रमाला आली होती. या कार्यक्रमाला जवळपास दीड तास थांबली. या कार्यक्रमाला गर्दी प्रचंड होती की, तिला कार्यक्रमातून बाहेर निघता आले नाही. पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं, त्याविषयी आभार. बाऊन्सरने रांग लावून तिला तळघरात नेलं. त्यानंतर अभिनेत्री काजल राघवानीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

कार्यक्रमाला अचानक गर्दी कशी झाली?

काजल राघवानी ही भोजपुरी इंड्रस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री (Actress) आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. तिच्या चाहत्यांना काजल राघवानी येत असल्याचं कळलं. त्यानंतर तिला पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची एकच मोठी गर्दी झाली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला. परंतु प्रसंगावधानात राखत अभिनेत्री गर्दीतून सुटका मिळवण्यास यशस्वी झाली. तिच्या चाहत्यांच्या गर्दीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तिच्या चाहत्यांची गर्दी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी