जन्मदात्या आईकडून बाळाची हत्या, खर्च परवडत नसल्याने इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन खाली फेकलं!

जन्मदात्या आईने नवजात बाळाला इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Kandivali baby killed by mother) आहे.

जन्मदात्या आईकडून बाळाची हत्या, खर्च परवडत नसल्याने इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन खाली फेकलं!

मुंबई : जन्मदात्या आईने नवजात बाळाला इमारतीच्या 17 व्या मजल्यावरुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Kandivali baby killed by mother) आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. यात त्या बाळाचा मृत्यू झाला (Kandivali baby killed by mother) आहे. दरम्यान सध्या पोलिस घटनास्थळी चौकशी करत (Kandivali baby killed by mother) आहेत.

कांदिवली पश्चिम या ठिकाणी असणाऱ्या जय भारत या इमारतीत ही सर्व घटना घडली आहे. दुपारी 3.30च्या सुमारास पोलिसांना जय भारत या इमारतीच्या आवारात एक नवजात बाळ सापडले. त्यानंतर पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात (Kandivali baby killed by mother) केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवजात बाळाला त्याच्या आईनेच बाथरुमच्या खिडकीतून खाली फेकले होते. त्यामुळे त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याला यापूर्वी एक मुलगा आणि मुलगी आहे. या दोघांना आधीच त्यांचा खर्च परवडत नव्हता. त्यातच त्यांना तिसरी मुलगी झाली. या कारणामुळे बाळाचा जन्म झाल्यानंतर आईनेच तिला 17 व्या मजल्यावरुन खाली (Kandivali baby killed by mother) फेकले.

दरम्यान सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास कांदिवली पोलिस करत आहे. तसेच पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

Published On - 10:05 pm, Thu, 5 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI