AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत ‘डोअर टू डोअर’ कोरोना लसीकरण, सोसायटीमध्ये लसीकरणाला सुरुवात

मुंबईतील एका सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. (Mumbai Corona vaccination in society)

मुंबईत 'डोअर टू डोअर' कोरोना लसीकरण, सोसायटीमध्ये लसीकरणाला सुरुवात
mumbai corona vaccination in society
| Updated on: May 29, 2021 | 12:42 PM
Share

मुंबई : मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील एका सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली महापालिका ठरली आहे. (Mumbai Corona vaccination started in a society)

डोअर टू डोअर कोरोना लस मिळण्यास सुरुवात

मुंबईतील गोवंडी पूर्व भागातील रहेजा सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डोअर टू डोअर कोरोना लस मिळण्यास सुरुवात झाली आहे.

रहेजा सोसायटीत सर्वप्रथम लसीकरण

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सोसायटयांना खासगी रुग्णालयासोबत करार करून लसीकरण करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मुंबईतील रहेजा सोसायटीने करार केला आहे. यामुळे रहेजा सोसायटीतील रहिवासी, ड्रायव्हर, घर काम काम करणाऱ्या महिला यांचे लसीकरण केलं जातं आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली पालिका 

मुंबईत सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली पालिका ठरली आहे. यामुळे लसीकरणचा वेग वाढणार आहे, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले. तसेच मुंबईत कोरोना लसीकरणाचा तुटवडा लक्षात घेता याबाबतचे ग्लोबल टेंडर काढलं आहे. एकदा लस मिळाली की मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल. त्यानंतर मग सोसायटींना मोफत लस देण्याबाबतचा विचार करु, असेही राहुल शेवाळे सांगितले.

लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील 6 सिस्टर सिटीजने मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे. (Mumbai Corona vaccination started in a society)

संबंधित बातम्या : 

Corona Vaccination | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे Walk In लसीकरण

Corona Vaccine | मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराची माघार, इतर 7 कंपन्यांकडून कागदपत्रं नाहीत

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...