Corona Vaccination | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे Walk In लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

Corona Vaccination | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे Walk In लसीकरण
BMC Corona Vaccine
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 12:03 AM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. (BMC will organize Walk In vaccination for those going abroad for education)

मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना वॉक इन (Walk In) सुविधेद्वारे लस दिली जाणार आहे. यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. या विद्यार्थ्यांना कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा पुरवली जाणार आहे.

येत्या सोमवारपासून ऑन स्पॉट वॉक इन लसीकरण सुविधा सुरु केली जाणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार यादिवशी विविध गटातील लाभार्थ्यांना राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.

ऑनस्पॉट वॉक इनसाठी पात्र लाभार्थी वर्ग

  • 45 आणि त्यावरील वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या / दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि दिव्यांगांना प्राधान्य असेल
  • आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस कोविशील्डच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी
  • कोव्हॅक्सिनच्य सर्व वयोगटातील दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि दिव्यांगांना प्राधान्य
  • स्तनदा माता
  • 18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा
  • गुरुवार, शुक्रवार, शनिवार कोव्हिन अॅपवरील नोंदणीनुसारच 100 टक्के लसीकरण

लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील 6 सिस्टर सिटीजने मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Vaccine | मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराची माघार, इतर 7 कंपन्यांकडून कागदपत्रं नाहीत

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

(BMC will organize Walk In vaccination for those going abroad for education)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.