मुंबई महापालिकेची लस मिळवण्यासाठी धडपड, थेट जगातील 6 शहरांच्या महापौरांना पत्र

कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. (Corona vaccine for Mumbai from 6 sister cities)

मुंबई महापालिकेची लस मिळवण्यासाठी धडपड, थेट जगातील 6 शहरांच्या महापौरांना पत्र
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  याच पार्श्वभूमीवर जगातील 6 सिस्टर सिटीजने मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे. (BMC demands to provide corona vaccine for mumbai from 6 sister cities in the world)

मुंबई महापालिकेच्या पत्रात काय?

जगातील सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या शहरातील महापौरांना मुंबई महापालिकेकडून पत्रं रवाना करण्यात आली आहेत. सध्याच्या कठीण काळात मुंबईला कोविडशी लढण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तसेच या शहरांनी यशस्वीपणे कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे मुंबई शहराला मदतीचा हात द्यावा. तसेच उपलब्ध असतील त्या लसीचे 1 कोटी 80 लाख डोस द्यावेत, असे मुंबई महापालिकेने पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी वेगवेगळ्या कार्यक्रमांसंदर्भात मुंबईचे या 6 सिस्टर सिटीजसोबत संबंध आले आहेत. अनेकदा अधिकारी आणि महापौरांच्या भेटीगाठीही झाल्या आहेत. त्यामुळे या 6 सिस्टर सिटीजने मुंबईला लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

तसेच या सहा 6 शहरांनी लसीच्या डोसची किंमत कळवून पुढील व्यवहार ठरवावा, असेही पालिकेने या पत्रात नमूद केले आहे. या 6 शहरांपैकी जपानमधील योकोहोमा या शहरानं लस नाही. पण मुंबईसाठी आर्थिक मदत पाठवू, असे कळवले आहे.

कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर

मुंबईत अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. या टेंडरद्वारे 1 कोटी डोसची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली होती.

मुंबई महापालिकेच्या या प्रस्तावाला एकूण 8 पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली आहे. यात एक कोटी डोस खरेदीसाठी 8 पुरवठादार आले होते यातील फायझर अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणाऱ्या कंपनीने माघार घेतली आहे.

फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीची माघार

पण ही माघार घेण्याचे नेमकं कारण काय? याचा कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. तसेच कोणतेही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान सध्या मुंबई महापालिका उर्वरित 7 पुरवठादारांबरोबर चर्चा करत आहे. कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस मिळावी, असे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पण इतर सात कंपन्यांनी अद्याप याबाबतची आवश्‍यक कागदपत्र सादर केलेली नाहीत.त्यामुळे पालिकेच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. (BMC demands to provide corona vaccine for mumbai from 6 sister cities in the world)

संबंधित बातम्या : 

Corona Vaccine | मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराची माघार, इतर 7 कंपन्यांकडून कागदपत्रं नाहीत

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI