
सध्या मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. रविवार मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. आज सकाळपासून पावसाने जोर धरलाय. त्यामुळे नेहमीच्या हिंदमाता परिसर, अंधेरी सब-वे या सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा कोलमडली आहे. सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक भागात पाणी साचलं आहे. ट्रॅफिक जामची स्थिती आहे. मुंबईत काल रात्रीपासून सकाळी 11 वाजेपर्यंत कुठल्या भागात सर्वाधिक पाऊस झालाय त्याची आकडेवारी.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार 25 मे 2025 च्या मध्यरात्रीपासून व सोमवार 26 मे 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ मिमी
ए विभाग कार्यालय २१६ मिमी
महानगरपालिका मुख्यालय २१४ मिमी
कुलाबा उदंचन केंद्र २०७ मिमी
नेत्र रूग्णालय, दोन टाकी २०२
सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स) १८०
मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३
ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३
सुपारी टँक, वांद्रे १०१
जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२
एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६
कोकणात पावसाची स्थिती काय?
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका.
खेड दापोली मार्गावरील पाताडी नदीला पूर. पुराचे पाणी रस्त्यावर.
‘फुरूस ‘ गावात नदीचे पाणी पात्रा बाहेर.
दापोली खेड तालुक्याला जोडणारा मार्ग पाण्याखाली.
दापोली खेड मार्गांवरील वाहतूक ठप्प.
वाहतूक मंडणगड मार्गे वळवली.
रायगड जिल्ह्यात पाली-खोपोली रोडवर पेडली जवळ अपघात
दोन डंपरमध्ये अपघात. अपघातात दोन्ही चालक जखमी असल्याची माहिती. अपघातामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी.
रायगडात मुसळधार पावसाचा तडाखा, रेड अलर्ट जारी
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रानं रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. पुढील काही तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.