AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fire : मुंबईतील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला आग, 15 जण जखमी; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु

मुंबईतील नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाचं असून अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलेलं आहे.

Mumbai Fire : मुंबईतील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला आग, 15 जण जखमी; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु
Mumbai Kamala Building fire
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 22, 2022 | 9:19 AM
Share

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये (BMC) गेल्या काही दिवसांपासून इमारतींना आग (Fire Broke Out) लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाचं असून अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलेलं आहे. कमला इमारत 20 मजल्यांची असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीच्या घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकरद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

आगीत सात जण जखमी

नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग

मुंबईतील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग लागलीय. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागलीय. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल 3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत 7 जण जखमी झाले असून त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळी 13 फायर इंजिन

आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं दिली आहे.

इतर बातम्या:

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा शिवसैनिंकाशी ऑनलाईन संवाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन

Priyanka Chopra | पाळणा हलला, प्रियंका चोप्रा झाली आई; मुलगा की मुलगी ? चाहत्यांना दिली खास माहिती

Mumbai level 3 fire broke out in 20 storeys Kamala building Bhatia hospital in Tardeo seven injured admitted to hospital

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली