AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | पाळणा हलला, प्रियंका चोप्रा झाली आई; मुलगा की मुलगी ? चाहत्यांना दिली खास माहिती

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आम्ही पालक झालो असून मला खूप आनंद झाला आहे, असं म्हणत आपण आई झाल्याचं प्रियंकाने (Priyanka Chopra becomes Mother) जाहीर केलंय.

Priyanka Chopra | पाळणा हलला,  प्रियंका चोप्रा झाली आई; मुलगा की मुलगी ? चाहत्यांना दिली खास माहिती
PRIYANKA CHOPRA
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 8:05 AM
Share

मुंबई : अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आम्ही पालक झालो असून मला खूप आनंद झाला आहे, असं म्हणत आपण आई झाल्याचं प्रियंकाने (Priyanka Chopra becomes Mother) जाहीर केलंय. प्रियंका चोप्राने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं होतं. पालक होण्यासाठी या दोघांनी सरोगसीचा पर्याय निवडलेला आहे. प्रियंकाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे.

बाळाचे स्वागत केले, खूप आनंदी आहोत

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियंकाने जाहीर केले आहे. “आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे,” असे प्रियंकाने इन्स्टाग्रामद्वारे सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंकाला मुलागा झाला की मुलगी ?

प्रियंका चोप्रा सरोगसीद्वारे आई झाली आहे. याबाबतचा संदेश प्रियंका चोप्राने दिला आहे. तसेच वडील झाल्याच्या बातमीला निक जोनासनेदेखील पुष्टी दिलेली आहे. मात्र, जन्माला आलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी हे दोघांनीही आद्यापतरी सांगितलेले नाही. दरम्यान, टीएमझेड या वृत्त संकेतस्थळाने प्रियंकाला मुलगी झाल्याचे सांगितलेले आहे. मात्र यावर अजूनतरी शिक्कामोर्तब झालेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

इतर बातम्या :

Pushpa in Hindi : ‘पुष्पा’ आता हिंदीमध्ये, लवकरच टीव्हीवरही दाखवला जाणार

RRR Movie Release Date: एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या ‘आरआरआर’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला, वाचा एका क्लिकवर

सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्ती भावूक, म्हणते, ‘तुझी खूप आठवण येतीये रे’

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली