AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRR Movie Release Date: एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या ‘आरआरआर’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला, वाचा एका क्लिकवर

एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या आरआरआर चित्रपटाच्या रिलीजचा मुहूर्त ठरला आहे, एसएस राजमौलीचा हा बहुचर्चित सिनेमा येत्या 18 मार्चला चित्रपट रिलीज करण्याची आमची तयारी असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा प्रदुर्भाव पाहता हा चित्रपट येत्या 28 एप्रिललाही रिलीज होण्याची शक्यता आहे.

RRR Movie Release Date: एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या 'आरआरआर'च्या रिलीजचा मुहूर्त ठरला, वाचा एका क्लिकवर
रिलीजचा मुहूर्त ठरला
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 7:54 PM
Share

मुंबई : एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या आरआरआर चित्रपटाच्या (RRR Movie Release Date) रिलीजचा मुहूर्त ठरला आहे, एसएस राजमौलीचा (SS Rajmaouli) हा बहुचर्चित सिनेमा येत्या 18 मार्चला रिलीज करण्याची आमची तयारी असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा (Corona) प्रदुर्भाव पाहता हा चित्रपट येत्या 28 एप्रिललाही रिलीज होण्याची शक्यता आहे. सध्या पाहवं तिकले याच चित्रपटाचा बोलबाला आहे. हा चित्रपट ज्या दिग्दर्शकाने ऐतिहासिक सिनेमा बाहुबली बनवला त्या एसएस राजमौलीचा आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षाकांना मोठी प्रतीक्षा आहे. राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाने जे रेकॉर्ड बनवले आहे, ते अजूनतर कुणाला तोडता आले नाही. त्यांचा हाच चित्रपट बाहुबलीचे रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथचा सुपरस्टार एनटीआर, सुपरस्टार रामचरण आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडमधून फक्त आलीय भटच नाही तर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणही या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. त्यामुळे या मल्टीस्टार चित्रपटाची सगळीकडे हवा आहे. राजमौलीच्या बाहुबली चित्रपटाला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर प्रत्येक बॉलिवूड तसेच देशभरातील अभिनेत्यांना त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला आहे. त्यावर प्रेक्षकांच्या लाईक आणि कमेटचा पाऊस पडतोय. बाहुबलीसारखाच हाही त्याचा सिनेमा इतिहासातील काहणीवर अधारित आहे.

रिलीजवर कोरोनाचे सावट

देशात पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्याने या चित्रपटाच्या रिलीजवरही टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे. कारण तिसऱ्या लाटेत पुन्हा मोठी रुग्णवाढ होत असल्याने देशातील अनेक राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रिलीज डेट मागेपुढे होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील जबरदस्त अॅक्शनची आणि गाण्यांची जास्त चर्चा आहे. खासकरून एनटीआर आणि रामचरण यांचा सोबत केलेला डान्स तर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना या चित्रपटाची जास्त उत्सुकता लागली आहे. चित्रपट वेळेत रिलीज होणार की तारखा मागेपुढे होणार हे येणारा काळच सांगेल.

सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्ती भावूक, म्हणते, ‘तुझी खूप आठवण येतीये रे’

salman khan : नवं वर्ष, नवं गाणं, सलमान खानच्या ‘मैं चला’ गाण्याचा टिझर आऊट

मी नथुराम साकारल्यावर पवारांनी मला विरोध केला नाही, भुजबळ तर माझ्या पाठिशी होते : शरद पोंक्षे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.