salman khan : नवं वर्ष, नवं गाणं, सलमान खानच्या ‘मैं चला’ गाण्याचा टिझर आऊट

salman khan : नवं वर्ष, नवं गाणं, सलमान खानच्या 'मैं चला' गाण्याचा टिझर आऊट
सलमान खान

मुंबई : बॉलीवूडचा टायगर सलमान खान (salman khan) त्याच्या चाहत्यांसाठी सतत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. आताही सलमानचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. याची माहिती सलमानने स्वत: दिली आहे. ‘मैं चला तेरी तरफ’ (main chala teri taraf) असे या गाण्याचे बोला आहेत. सलमान खानचं ट्विट सलमानने नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने आपल्या नव्या […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 21, 2022 | 5:36 PM

मुंबई : बॉलीवूडचा टायगर सलमान खान (salman khan) त्याच्या चाहत्यांसाठी सतत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. आताही सलमानचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. याची माहिती सलमानने स्वत: दिली आहे. ‘मैं चला तेरी तरफ’ (main chala teri taraf) असे या गाण्याचे बोला आहेत.

सलमान खानचं ट्विट

सलमानने नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली आहे. ‘मैं चला’ हे सलमानचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. आज या गाण्याचा टिझर आलाय. तर उद्या हे पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गाणं कुणी गायलं आहे?

‘मैं चला’ हे गाणं पंजाबी गायक गुरू रंधावा आणि सलमानची जवळची मैत्रिण यूलिया वंतूरने गायलं आहे. तर तेलगू अभिनेत्री प्रज्ञा जायसवाल सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतेय. सध्या या गाण्याचा फक्त टिझर आला आहे. उद्या पूर्ण गाणं प्रदर्शित होणार आहे.

सलमानचा लूक

अभिनेता सलमान खान नेहमी वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करताना दिसतो. आताही या नव्या गाण्यात सलमान एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळतोय. यात सलमानचे केस खूप मोठे दाखवण्यात आले आहेत. सलमान पंजाबी लूकमध्ये दिसतोय. त्याने पगडी घातलेली पहायला मिळतेय. त्यामुळे त्याचा नवा लूक आणि त्याचं गाणं प्रेक्षकांना किती भावतं हे पाहणं महत्वाचं असेल.

संबंधित बातम्या 

मी नथुराम साकारल्यावर पवारांनी मला विरोध केला नाही, भुजबळ तर माझ्या पाठिशी होते : शरद पोंक्षे

Malaika Arora : डबल मास्क लावला पण ब्रा नाही घातली, नेटकऱ्यांची मलायकावर शेरेबाजी

सईने नेसली साडी, लूक एकदम भारी, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें