Pushpa in Hindi : ‘पुष्पा’ आता हिंदीमध्ये, लवकरच टीव्हीवरही दाखवला जाणार

पुष्पा गेल्या वर्षी १७ डिसेंबरला सिनेमागृहात रिलीज झाला. या सिनेमाला जबरदस्त यश मिळाले. सिनेमा डिजिटल प्रीमियर झाला आणि १४ जानेवारीला अँमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. डिजिटल प्लँटफॉर्मवर सुद्धा सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमाचा हिंदी वर्जनच्या टेलिव्हिजन प्रिमिअरची तयारी सुरू झाली.

Pushpa in Hindi : 'पुष्पा' आता हिंदीमध्ये, लवकरच टीव्हीवरही दाखवला जाणार
पुष्पा हिंदी सिनेमा
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 8:38 PM

मुंबई : सिनेमाघर ते सोशल मीडियावर (Social Media) सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे’ पुष्पा’ (Pushpa). या सिनेमाने प्रेक्षकांवर आपली जबरदस्त छाप सोडली. फिल्म मेकर्स सुद्धा सिनेमाला अजून यशस्वी करण्यासाठी अजूनही प्रयत्न करतात. अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) ‘ पुष्पा’ सिनेमाने जबरदस्त कामगिरी करत प्रचंड प्रसिद्धी मिळवली. सिनेमा नुसता हीट झाला नाही तर सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा आणि कौतुक थांबायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस पुष्पा सिनेमाची लोकप्रियता वाढली आहे.

सिनेमाच्या याच यशाला कँच करत आता पुष्पा सिनेमा हिंदीमध्ये टीव्हीवर पहायला मिळणार आहे. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार २० किंवा २७ मार्चला सिनेमा टीव्हीवर रिलीज होईल. टेलिव्हिजन सोबतच पुष्पा सिनेमा गोल्डमाइन्स टेलीफिल्मच्या अॉफिशिअल युट्युबवर रिलीज होणार आहे. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सिनेमा रिलीज करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

सिनेमा वेगवेगळ्या प्लँटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी

बॉलिवूड हंगामात प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार गोल्डमाइन्स टेलीफिल्मचे मालक मनीष शहा यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ते पुष्पा सिनेमा आपल्या सर्वाधिक पॉप्युलर युट्युब चँनल गोल्डमाइन्स टेलीफिल्सवर रिलीज करतील. जेव्हा शहा यांना हा सिनेमा टीव्हीवर कधी येणार असे विचारले तेव्हा मनिष यांनी 20 किंवा 27 मार्चला दोन्ही प्लँटफॉर्मवर येतील असे सांगितले. रविवारी सिनेमाच्या प्रीमियरची तयारी झाली आहे. सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर होईल.अल्लू अर्जुनच्या सर्वाधिक यशस्वी सिनेमा ठरला ‘ पुष्पा’ पुष्पा सिनेमाचे हिंदी वर्जनचे प्रीमिअर मनीष शहा यांचेच टेलिव्हिजन चँनल ‘ ढिंचँक’ टीव्हीवर होणार आहे. अल्लू अर्जुनचा सिनेमा पुष्पाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यावर आता हा सिनेमा आता वेगवेगळ्या प्लँटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. मेकर्सला या सिनेमाचा जादू प्रेक्षकांवरून कमी होऊ द्यायची नाही. म्हणूनच सिनेमा वेगवेगळ्या प्लँटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी सुरू झाली.

सिनेमाच्या हिंदी व्हर्जनची 90 कोटी रूपयांपर्यंत कमाई

या सिनेमाने 200 कोटी रूपयांची कमाई केली. अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीत पुष्पा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला 90 कोटी रूपयांपर्यंत कमाई केली आहे. या सिनेमात अल्लू अर्जूनसह रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली असून लवकरच शुटिंग सुरू होणार आहे. या सिनेमाने साऊथ इंडस्ट्रीजचा प्रभाव आणि लोकप्रियता अजून वाढली आहे. त्यामुळेच सिनेमा वेगवेगळ्या प्लँटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल.

इतर बातम्या :

RRR Movie Release Date: एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या ‘आरआरआर’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला, वाचा एका क्लिकवर

salman khan : नवं वर्ष, नवं गाणं, सलमान खानच्या ‘मैं चला’ गाण्याचा टिझर आऊट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.