AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Update | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल सुरु होण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली. (Mumbai Local Start From February Said Aslam Sheikh)

Mumbai Local Update | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल सुरु होण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 29, 2021 | 2:25 PM
Share

मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सुरु होण्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी वर्तवली आहे. यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून लोकल प्रवासासाठी वेट अँड वॉच करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच प्रवास करता येणार आहे. (Mumbai Local May Start From February Said Aslam Sheikh)

नुकतंच रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या लोकलची संख्या वाढवली आहे. यानंतर आता राज्य सरकारकडून अॅक्शन प्लॅन राबवला जात आहे. राज्य सरकारकडून स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (Sop) करण्यात आला आहे. या SOP नुसार रेल्वेसेवा वेळापत्रकही निश्चित केलं जाईल, असेही अस्लम शेख म्हणाले.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

मुंबईची लोकल सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता पालकमंत्री असलम शेख यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनीही लवकरच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होईल, असे म्हटले आहे

मुंबई लोकल ट्रेन लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या 29 जानेवारी किंवा 1 फ्रेबुवारीपासून ही लोकल सर्वांसाठी सुरु होण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर ट्रेन सुरु झाली तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर जेवढा शक्य असेल तेवढा करावा, असे किशोरी पेडणेकरांनी सांगितले. (Mumbai Local May Start From February Said Aslam Sheikh)

येत्या शुक्रवारी 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल रुळावर धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला 1201 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, आता त्यामध्ये 166 फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवल्या जाणार आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. या बैठकीनंतर वेगाने हालचाली होत असल्याचेच संकेत पश्चिम रेल्वेच्या निर्णयातून दिसत आहेत.

मुंबईच्या लोकल ट्रेनच्या निर्णय दिल्लीतूनच होणार

सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे. त्यामुळे याबाबतचे राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेऊन रेल्वेकडून येत्या काही दिवसांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईच्या धर्तीवर मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अन्य पर्याय असणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास दूरच्या उपनगरांतून मुंबईत दररोज येजा करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना मात्र खूप मोठा दिलासा मिळेल. (Mumbai Local May Start From February Said Aslam Sheikh)

संबंधित बातम्या :  

Mumbai Local train latest update : सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरु

Mumbai Local Train Update | आनंदाची बातमी; पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार

Mumbai Local Train Latest Update | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...