AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train Update | आनंदाची बातमी; पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार

मुंबईत येत्या 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वे पूर्ववत सुरु केली जाणार आहे. (Mumbai Local Train Update)

Mumbai Local Train Update | आनंदाची बातमी; पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार
mumbai local
| Updated on: Jan 26, 2021 | 11:26 PM
Share

मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरु केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वे सेवा पूर्ववत सुरु केली जाणार आहे. पण यात केवळ रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेल्या लोकांना प्रवास करता येणार आहे. मात्र सर्वसामान्यांना प्रवासासाठी अद्याप वेट अँड वॉच करावं लागणार आहे. नुकतंच पश्चिम रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. (Mumbai Local Train Update)

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल रुळावर धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला 1201 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, आता त्यामध्ये 166 फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवल्या जाणार आहे.

दरम्यान पश्चिम रेल्वे जरी पूर्ण क्षमतेने धावणार असली, तरी यात रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान COVID19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. इतरांना स्टेशनवर गर्दी करू नये अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. या बैठकीनंतर वेगाने हालचाली होत असल्याचेच संकेत पश्चिम रेल्वेच्या निर्णयातून दिसत आहेत.

मुंबईच्या लोकल ट्रेनच्या निर्णय दिल्लीतूनच होणार

सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे. त्यामुळे याबाबतचे राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेऊन रेल्वेकडून येत्या काही दिवसांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईच्या धर्तीवर मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अन्य पर्याय असणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास दूरच्या उपनगरांतून मुंबईत दररोज येजा करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना मात्र खूप मोठा दिलासा मिळेल (Mumbai Local Train Update)

संबंधित बातम्या : 

Mumbai Local Train Latest Update | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.