AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde| मुंबईचं दैवत सिद्धिविनायक चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणरायाला काय साकडं?

सिद्धिविनायक मंदिरात आज सदा सरवणकर, दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार घेऊन एकनाथ शिदे दर्शनासाठी पोहोचले.

CM Eknath Shinde| मुंबईचं दैवत सिद्धिविनायक चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणरायाला काय साकडं?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 05, 2022 | 3:44 PM
Share

मुंबईः मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात  (Siddhivinayak Temple)आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पोहोचले. मुख्यमंत्री आपल्या महत्त्वाच्या पदाधिकारी आणि आमदारांसह आज सिद्धिविनायक मंदिरात गेले. तेथे पुजाऱ्यांनी गणरायाची विधिवत पूजा केली आणि प्रसाद म्हणून गणपतीचं मानाचं नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. कालच विधानसभेत (Maharashtra Assembly) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कामावर रूजू झाले असून कामाच्या सुरुवातीलाच गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी आज सिद्धीविनायक मंदिर गाठलं. मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाची सिद्धीविनायकावर नितांत श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीदेखील अगदी साधेपणाने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

साकडं काय घातलं?

महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री आमदार यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. पाहता पाहता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असलेलं महाविकास आघाडी सरकार धारातीर्थी पडलं. आता भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेना गटासह नवीन सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झालेत. पुढील अडीच वर्षांसाठी त्यांनी राज्याचा कारभार हाती घेतला आहे. मात्र शिंदेंसमोर आव्हानंही तितकीच आहेत. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच राज्यात सर्वत्र दमदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. पावसाच्या प्रमाणानुसार, योग्य नियोजन करण्याच्या त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. राज्यातलं नवं सरकार यशस्वीरितीने कामगिरी करेल, त्यासाठी बळ दे, अशीच जणू प्रार्थना त्यांनी सिद्धिविनायक चरणी केली असावी.

मानाचं नारळ देऊन स्वागत

सिद्धिविनायक मंदिरात आज सदा सरवणकर, दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार घेऊन एकनाथ शिदे दर्शनासाठी पोहोचले. यावेळी मंदिरातील गुरुजींनी नव्या मुख्यमंत्र्यांना गणपतीचं मानाचं नारळ आणि शाल देऊन स्वागत केलं. गणपतीचा प्रसादही नवनियुक्त मुख्यमंत्र्यांना दिला. त्यानंतर शिंदेसेनेचा ताफा मंत्रालयाच्या दिशेने निघाला.

उपमुख्यमंत्री नागपुरात

दरम्यान, उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच नागपुरात पोहोचले. नागपूर विमानतळापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. शहरातून देवेंद्र फडवणीस यांची मोठी विजयी रॅली काढण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी विजयी रॅलीला संबोधित केले.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत