Mumbai News : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, 60 जणांची सुखरूप सुटका, 39 जण रुग्णालयात दाखल

मुंबईतील कुर्ला येथील इमारतीला भीषण आग लागल्याने एकच खळबळ माजली. इमारतीमधून ६० हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai News :  कुर्ल्यात इमारतीला  भीषण आग, 60 जणांची सुखरूप सुटका, 39 जण रुग्णालयात दाखल
| Updated on: Sep 16, 2023 | 10:14 AM

कुर्ला | 16 सप्टेंबर 2023 : कुर्ला | 16 सप्टेंबर 2023 : मुंबईत एक मोठी दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. कुर्ला येथील एका इमारतीला भीषण आग (fire in building) लागल्याने एकच गदारोळ माजला. ही आग एवढी भीषण होती की सुमारे 39 नागरिक जखमी झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमनल दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात (hospital) उपचार सुरू आहेत.

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर हॉस्पिटलसमोरील १२ मजली इमारतीमध्ये  शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. आगीमुळे इमारतीत जवळपास 50 ते 60 जण अडकले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. मात्र आगीच्या धुरामुळे सुमारे 43 रहिवाशांना त्रास होऊ लागला, त्यापैकी 39 जणांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. तर उर्वरित चौघांना कोहिनूर रुग्णालयात नेण्यात आले. त्या सर्वांवर उपचार सुरू असून काहींना घरी सोडण्यात आले.

दरम्यान अग्निशमनल दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.