तो साडी घेऊन आला अन् पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने अश्लील… डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने मुंबई हादरली

Mumbai Crime : एका डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने मुंबई हादरली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

तो साडी घेऊन आला अन् पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने अश्लील... डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने मुंबई हादरली
Delivery Boy Arrested
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 26, 2026 | 3:56 PM

सध्याच्या काळात ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक घरातील सामानासह कपडे आणि इतर वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतात. काही दिवसांमध्ये किंवा अगदी काही तासांत ती वस्तू आपल्या घरी पोहोचते. यामुळे डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या लोकांना रोजगारही मिळाला आहे. मात्र आता एका डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने मुंबई हादरली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मालाडमधील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साड़ीची ऑर्डर दिली होती. जेव्हा डिलिव्हरी बॉय साडी घेऊन महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा 12 वर्षांची पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी त्याने सांगितले की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत, माझ्यासोबत कोणालातरी खाली पाठवा मी पैसे देतो. मग डिलिव्हरी बॉयसोबत ती मुलगी खाली गेली. त्यावेळी पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने, त्याने तिला त्याच्या मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. यामुळे ती मुलगी ओरडायला लागली, त्यानंतर आरोपी फरार झाला.

एकाला अटक

या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद उपेश अनवर अंसारी आहे असून तो 24 वर्षांचा आहे आणि मालाड मालवणीचा रहिवासी आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस आरोपीने इतरत्र कुठे असे कृत्य केले आहे की नाही, याचा तपास करत आहेत.

दरम्यान, याआधीही अनेकदा डिलिव्हरी बॉयने ग्राहकांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काहीवेळा पार्सल खराब निघाल्याने ग्राहक आणि डिलिव्हरी बॉय यांच्यात वाद होतात. काही वेळा दोघांकडून एकमेकांना मारहाण देखील झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता मुंबईत मात्र मोहम्मद उपेश अनवर अंसारी या डिलिव्हरी बॉयने हद्दच ओलंडली आहे. आता या डिलिव्हरी बॉयवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us