AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Graduate-Teacher Election: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात, काँग्रेसही आघाडीवर, मग भाजपचा स्ट्राईक रेट किती?

Maharashtra MLC Graduate Teacher Election Result: गेल्या काही निवडणुकीपासून भाजपचा स्ट्राईक रेट हा मोठ्या परवलीचा शब्द झाला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचे वारू कसे उधळले, जनतेत भाजपची किती क्रेझ आहे हे स्ट्राईक रेटमधून बिंबवण्यात येत होते. मग शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत काय राहिला भाजपचा स्ट्राईक रेट?

Graduate-Teacher Election: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात, काँग्रेसही आघाडीवर, मग भाजपचा स्ट्राईक रेट किती?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात, काँग्रेसही आघाडीवर, मग भाजपचा स्ट्राईक रेट किती?
| Updated on: Oct 29, 2026 | 11:41 AM
Share

NCP Congress BJP Strike Rate : मागील काही निवडणुकीच्या निकालात बहुमताच्या आकड्यांपेक्षा स्ट्राईक रेटला भारी महत्त्व आले होते. स्ट्राईक रेट हा गेल्या काही निवडणुकीतील परवलीचा शब्द ठरला आहे. हा शब्द कसा आणि कुठून आला हा भाग अलहिदा. पण सत्तारूढ पक्षाचे जनतेवरील गारूड किती पक्कं आहे, याचा हा प्रतिशब्द झाला इतके मात्र नक्की. आता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघातील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. तीन पदवीधर मतदारसंघ भाजपच्या हातून गेले. तर पुणे काबीज करण्यात भाजपला तर अमरावतीत शिंदे सेनेला शिक्षक मतदारसंघात यश आले. या हाराकिरीवरून महायुतीतील मित्रपक्षात रणकंदन सुरू असतानाच स्ट्राईक रेटनेही भाजपची झोप उडवली आहे.

महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चर्चेत

तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे निकाल एकदाचे समोर आले. दोन दिवसांपासून अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. आता निकाल लागल्यावर जीव टांगणीला लागला आहे. तर निवडणुकीत विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीने सरस कामगिरी केली आहे. महायुतीला शिक्षक मतदारसंघात सूर गवसला खरा पण पदवीधर त्यांच्याविरोधात गेल्याचे चित्र आहे. या निकालात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ठसठशीत यश मिळवले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

शरद पवार राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 100 टक्के

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट 100 टक्के दिसून आला. मराठवाडा पदवीधर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात या पक्षाने चमकदार कामगिरी बजावली. मराठवाड्यात 18 वर्षानंतर पदवीधरांनी नवीन आमदार निवडला. यापूर्वी सतीश चव्हाण हेच समीकरण झाले होते. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या रुपाने नवीन आमदार विधान परिषदेत जाणार आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांच्या रुपाने तरूण चेहरा पक्षाने कमावला.

एकच जागा, पण काँग्रेसने किल्ल्याला सुरूंग लावला

काँग्रेसला या निवडणुकीत एकच जागा मिळवता आली. पण या एकाच जागेने भाजपला जिव्हारी लावणारा पराभव दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच विकेट पाडण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे कसब दिसून आले. सत्ताधाऱ्यांच्या हाती यंत्रणा असतानाही इथं सपाटून मार खावा लागल्याने त्याचे शल्य लवकर जाणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट 50 टक्के इतका राहिला आहे.

भाजपचा स्ट्राईक रेट 33.33 टक्के

सत्ताधारी आणि मोठ्या भावाच्या भूमिकेतील भाजपला नागपूरच्या पराभवाने अस्वस्थ केले आहे. पुण्यातील शिक्षक मतदारसंघातील विजय यामुळे फिक्का झाला. या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 33.33 टक्के इतकाच राहिला. शिवसेना शिंदे गटाला अमरावती शिक्षक मतदारसंघ राखता आला. पण महाविकास आघाडीतील उद्धव सेनेला खातंही उघडता आलं नाही.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय