AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: डोक्याला हे काय लावून फिरतोय शुभमन गिल? न्यूझीलंडमधील ‘तो’ Video Viral

Shubman Gill IND vs NZ: भारतीय पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shubman Gill: डोक्याला हे काय लावून फिरतोय शुभमन गिल? न्यूझीलंडमधील 'तो' Video Viral
| Updated on: Oct 29, 2026 | 11:36 AM
Share

Shubman Gill News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळला जाईल. भारतीय संघाने ही मालिका आधीच जिंकली आहे पण तरीही भारतीय संघाचे क्लिन स्वीप करण्याचे स्वप्न असणार आहे. आता यानंतर वनडे सामने सुरु होणार आहे. याआधीच आता कर्णधार शुभमन गिल टी-२० संघासोबत सामील झाला आहे. पण अशातच गिलचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यापूर्वी, एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल संघात सामील झाला आहे. गिल केवळ संघात सामीलच झाला नाही, तर त्याने सरावादरम्यान खेळाडूंसोबत कठोर परिश्रमही घेतले. गिल भारतीय टी-२० संघाचा भागही नाही, मग तो टी-२० संघात काय करत आहे? हा चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर भारत तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला जाईल. गिल भारतीय टी-२० संघात सामील झाला आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणावर सराव केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयाची हॅटट्रिक साधल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामनाही जिंकून यजमानांना क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल. गिलचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात गिलने त्याला कपाळावर एक छोटं डिवाईस लावलेलं पाहायला मिळत आहे. हे ब्रेनमधील एक्टिव्ही कंट्रोल ठेवण्याचे काम करते असे म्हटले जाते.

कर्णधार शुभमन गिल, वरिष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार हे देखील ऑकलंडमध्ये टी-२० संघासोबत सराव करताना दिसले. भारतीय खेळाडूंची ही तयारी न्यूझीलंडचा हा दौरा किती गांभीर्याने घेत आहेत हे दर्शवते. राहुल अलीकडेच झालेल्या भारत ‘अ’ विरुद्ध न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील अनधिकृत कसोटी सामन्याचाही भाग होता, ज्यात त्याला दोन्ही डावांमध्ये खाते उघडता आले नाही. पहिल्या डावात त्याला खाते उघडता आले नाही आणि दुसऱ्या डावात तो ४ धावांवर हिट विकेट बाद झाला.

गिलने सोमवारी ऑकलंडमध्ये टी-२० संघापासून दूर सराव करताना, प्रामुख्याने लाल चेंडूच्या गोलंदाजांसह पाच स्थानिक गोलंदाजांविरुद्ध बराच वेळ फलंदाजी केली. कर्णधार आपल्या तयारीमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये, इतकेच नव्हे तर त्याने पाच वैयक्तिक नेट गोलंदाजांचा प्रवास, निवास आणि इतर खर्चासही स्वतःच्या खिशातून दिला असल्याचेही वृत्त आहे.

Follow Us
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका