“मी पुन्हा पोरका झालो…”, नाना पाटेकर यांना घडवणाऱ्या विजया मेहता कोण? त्यांच्या निधनाने नानांना बसला होता धक्का
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांच्या अभिनयाची अनेकांना भुरळ आहे. पण त्यांना घडवणाऱ्या विजया मेहता कोण आहेत? त्यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांना बसला होता धक्का. गुरूच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यानंतर नाना यांनी एक्झिट घेतली.

Nana Patekar-Vijaya Mehta : संवेदशनील अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. गोव्यात 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिनेसृष्टीवर गारुड निर्माण केले. त्यांची संवादफेक, अभिनयाची शैली हे एक समीकरणचं ठरलं होतं. सामाजिक आणि ज्वलंत प्रश्नावर भाष्य करायला ते कधीच डगमगले नाहीत. अभिनयाच्या विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांच्या तालमीत नानांची जडणघडण झाली. अभिनयाचे कांगोरे, संवादफेक आणि दीर्घ ,पल्लेदार संवादाचे धडे त्यांनी याच विद्यापीठातून गिरवले. याचवर्षी त्यांच्या गुरू विजया मेहता यांचे निधन झाले. त्यांना शोक अनावर झाला होता.
सर्वच भूमिका सशक्तपणे मांडल्या
नाना पाटेकर यांनी सुरुवातीच्या चित्रपटात मध्यमवर्ग, गरिबीशी झगडणाऱ्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व केले. गमन, आज की आवाज, अंकुश असो वा परिंदा त्यांच्यातील ताकदीचा अभिनेता समोर आला. कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. हमीदाबाईची कोठीपासून ते क्रांतीवीर, प्रहार, यशवंत, गुलाम-ए-मुस्ताफा असो वा इतर चित्रपटांनी व्यवस्थेविरोधात झगडणारा, उसळणारा तरुण समोर आला. परिंदामधील खलनायकाची भूमिका अनेकांच्या मनात घर करून गेली. नटसम्राटमधील भूमिका त्यांनी अजरामर केली. कुठली तरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरच नाही तर कधी पडद्यावर साकारला.
विजया मेहता यांच्या मुशीतील नट
ज्येष्ठ रंगकर्मी, आशयघन नाटककर्त्या विजया मेहता हे जणू अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठच होते. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी दत्तात्रेय आणि भुराबाई या दाम्पत्यापोटी बडोदा इथं झाला. मुंबईत त्यांनी प्रायोगिक रंगभूमीची मुहुर्तमेढ रोवली होती. एक कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्या तालमीत अनेक दिग्गज कलाकार बाहेर पडले. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्यासह त्यांनी रंगायन ही चळवळ उभारली होती. हमीदाबाईची कोठडीने तर त्याकाळी मुंबईसह राज्यातीलच नाही तर गुजराती नाट्यप्रेमींना वेड लावले होते. हिंदी पट्ट्यात तर या नाटकाची पारायण झाली होती. मला उत्तर हवंय, संध्याछाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, बॅरिस्टर, सावित्री, पुरूष, वाडा चिरेबंदीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केले. नाना पाटेकर सुद्धा त्यांच्यात तालमीत तयार झाले.
मी पोरका झालो
यावर्षी 1 जुलै रोजी विजय मेहता यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांना शोक अनावर झाला होता. विजया मेहतांचे जाणे हे माझ्यासाठी आई गमावण्यासारखेच आहे. माझ्या आयुष्यात तीन स्त्रियांना आईचे स्थान होते. एक माझी जन्मदात्री आई, दुसऱ्या सुलभा देशपांडे आणि तिसऱ्या विजयाबाई. आईने मला जन्म दिला. पण अभिनयाच्या क्षेत्रात मला जे काही येतं, ते सगळं विजया मेहता यांनी शिकवलं. त्यांनी माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याला आकार दिला, अशी प्रतिक्रिया त्यावेळी नानांनी दिली होती. आपण आता पोरके झाल्याचे दु:खही त्यांनी व्यक्त केले होते.
