PM Modi: “परखड विचार मांडायला ते डगमगले नाहीत”, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठीत पोस्ट, अशा भावना केल्या व्यक्त
Nana Patekar Passes Away : संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर यांना काळाने आपल्यातून हिरावले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

PM Narendra Modi on Nana Patekar: दिग्गज आणि संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर यांचे आज 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. गोवामध्ये पहाटे 5:20 वाजता वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना 45 मिनिटांचा सीपीआर देण्यात आला. पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी नानांच्या स्वभावाचा परिचय दिला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी भावना व्यक्त केल्या.
परखड विचार मांडताना ते डगमगले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मोदी यांनी मराठीतून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. “श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2026
कलाविश्वात एक मोठी पोकळी
हिंदी आणि मराठी सिनेमात नाना पाटेकर यांचे मोठे योगदान आहे, असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. “हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शोक संवेदना
“दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकून तीव्र दु:ख आणि धक्का बसला आहे. थिएटर, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील त्यांचा शानदार प्रवास, दमदार अभिनयाने अमिट छाप सोडली आहे. त्यांचे कुटुंबियांच्या, मित्रांच्या, चाहत्यांच्या आणि चित्रपटसृष्टीच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. ओम शांती” अशा शोक संवेदना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्या.
