आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात कोणती मिटिंग करत होते?, हा षडयंत्राचा भाग होता का?; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत मिटिंग केली. हा षडयंत्राचा भाग होता का? हे माहीत नाही.

आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात कोणती मिटिंग करत होते?, हा षडयंत्राचा भाग होता का?; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप
ashish shelar
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 5:15 PM

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत मिटिंग केली. हा षडयंत्राचा भाग होता का? हे माहीत नाही. पण शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात झालेल्या दंगलीवरून भाजवर गंभीर आरोप केले. आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. त्यांची रझा अकादमीच्या नेत्यांशी मिटिंग झाली. माझ्याकडे एक फोटो आहे. हा सुद्धा षडयंत्राचा हिस्सा होता की नाही माहीत नाही. पण राज्यात रझा अकादमीची ताकद नाही. त्यांचे काही मौलाना शहरात फिरत असतात. मात्र, राज्यात दंगल भडकवतील एवढी त्यांची ताकद नाही. पण त्यांच्या कार्यालयात बसून शेलार मिटींग करत होते. त्याची चौकशी होईल. सर्व दंगल करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असं मलिक म्हणाले.

तेव्हा भाजप दंगलीचं अस्त्रं बाहेर काढते

भाजपचे सर्व अस्त्र संपतात तेव्हा ते दंगलीचं अस्त्र बाहेर काढतात आणि आपलं राजकारण सुरू करतात. त्यांचं षडयंत्र राज्यातील जनतेला माहीत आहे. जनता त्यांच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही. आम्ही या राजकारणाचा निषेध नोंदवतो. त्यांनी अशा प्रकाराचं नकारात्मक राजकारण करू नये. अशा प्रकारचं राजकारण राज्यात चालणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

गोव्यात झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकार उखाड फेको असं सांगितलं. सरकारे उखाडे और बैठाये नही जाते. लोक सरकार निवडून देत असतात. सरकार उखाडने म्हणजे आमदार फोडा, पैशाने खरेदी करा असं सुरू आहे. गोव्यात हा खेळ सुरू झाला. पण महाराष्ट्रात होऊ शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दोन समुदायात दंगल झाली नाही

भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या. पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

‘आपका बंटी’, ‘महाभोज’च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

‘कितीही आवाज दाबला तरी आता हिंदू मार खाणार नाही’, अटकेनंतर अनिल बोंडेंची संतप्त प्रतिक्रिया