AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपका बंटी’, ‘महाभोज’च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन

'महाभोज' आणि 'आप का बंटी' सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मन्नू भंडारी यांचं आज निधन झालं.

'आपका बंटी', 'महाभोज'च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन
mannu bhandari
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 3:56 PM
Share

नवी दिल्ली: ‘महाभोज’ आणि ‘आप का बंटी’ सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मन्नू भंडारी यांचं आज निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, त्यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मन्नू भंडारी यांचा जन्म 3 एप्रिल 1939 रोजी झाला होता. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पती राजेंद्र यादवही प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव महेंद्र कुमारी ठेवलं होतं. मात्र, साहित्य क्षेत्राकडे मोर्चा वळवल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मन्नू ठेवलं होतं. बालपणी त्यांना सर्वच जण मन्नू म्हणून संबोधत असत. त्यामुळे त्यांनी याच नावाने लिखान केलं. पुढे मन्नू भंडारी हीच त्यांची ओळख झाली.

पुरुषप्रधान संस्कृतीवर ताशेरे

मन्नू भंडारी या प्रख्यात स्त्रीवादी लेखिका होत्या. त्यांच्या लेखनातून त्यांनी कायमच पुरुष प्रधान संस्कृती आणि वर्चस्वावर ताशेरे ओढले. त्यांनी अेक कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांवर सिनेमेही प्रदर्शित झालेले आहेत. त्यांच्या ‘यही सच है’ या कथेवर 1974मध्ये ‘रजनीगंधा’ सिनेमा बनला होता. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांनी हा सिनेमा बनवला होता.

दशकभरानंतर घटस्फोट

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजामध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापनाचं काम केलं. ‘मैं हार गई’, ‘तीन निगाहों की एक तस्वीर’, ‘एक प्लेट सैलाब’, ‘यही सच है’, ‘आंखों देखा झूठ’ और ‘त्रिशंकु’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या. या कादंबऱ्या वाचल्यानंतर त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळते. प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र यादव यांच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. ते ‘हंस’चे संपादकही होते. लग्नाच्या एक दशकानंतर या दोघांमध्ये वितुष्ट आलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यादव यांच्या निधनापर्यंत दोघेही वेगळे राहत होते.

स्वत:चीच वेदना मांडली

‘आपका बंटी’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दु:खाचं विश्व त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर झालेल्या त्रासाचं चित्रण त्यांनी या कादंबरीत केलं आहे. या कादंबरीने त्यांना यश मिळवून दिलं. त्यांची ‘महाभोज’ ही कादंबरीही गाजली. राजकीय आणि सामाजिक जीवनात आलेल्या मूल्यहीनतेवर या कादंबरीत भाष्य करण्यात आलं आहे. सिरोहा गावातील ही कहानी आहे. बिसेसर नावाच्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूचा राजकीय लाभ उठवण्यासाठी कसे राजकारणी प्रयत्न करतात, याचं वास्तवादी चित्रं या पुस्तकातून रेखाटण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

संप मागे घ्या, चर्चा करु; उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.